क्रिकेटर मुरली विजयच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलला!
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2017 06:15 PM (IST)
टीम इंडियाच्या कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजय तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. मुरली विजयनं ट्विटरवर आपल्या चिमुकल्याचा फोटो शेअर केला आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजय तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. मुरली विजयनं ट्विटरवर आपल्या चिमुकल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विजयच्या मोठा मुलानं आपल्या छोट्या भावाला हातात घेतलं आहे. याआधी मुरली विजयला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्याच्या पहिल्या मुलाचं नाव निरव आणि मुलीचं नाव इवा आहे. 2012 साली मुरली विजयचं लग्न निकिताशी झालं होतं. निकताचं हे दुसरं लग्न आहे. निकिता आधी भारतीय संघाचा विकेटकीपर दिनेश कार्तिकची पत्नी होती.मात्र, कार्तिकशी फारकत घेऊन तिनं मुरली विजयशी लग्न केलं होतं. मुरली विजयनं भारतासाठी 51 कसोटी, 17 वनडे आणि 7 टी-20 सामने खेळला आहे. कसोटीत मुरली विजयच्या नावावर 3408 धावा जमा आहेत. तर वनडेमध्ये 339 आणि टी-20 मध्ये 169 धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विजयनं 9 शतकं आणि 15 अर्धशतकंही झळकावली आहेत.