'हे एक कौटुंबिक प्रकरण आहे आणि शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. माझ्या माहितीनुसार शमी एका चांगला माणूस आहे' असं म्हणत धोनीने शमीबाबत फारसं बोलण्यास नकार दिला.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतन चौहाननेही शमीचं समर्थन केलं होतं. 'बीसीसीआयने मोहम्मद शमीचा करार थांबवता कामा नये. या प्रकरणाचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही आणि तो अद्याप दोषी सिद्ध झालेला नाही' असं चौहानने म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला होता. इतकंच नाही, तर शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले होते. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला होता.
कोलकात्यातील लाल बाजार पोलिसात मोहम्मद शमीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी शमी आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पाकिस्तानी युवतीकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करत हसीन जहांने अप्रत्यक्षपणे मॅच फिक्सिंग केल्याची शंका व्यक्त केली आहे.
27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये हसीन जहांसोबत झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे.
त्याआधी, हसीन जहा आणि शेख सैफुद्दीन यांचा 2002 साली प्रेम विवाह झाला होता. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. हसीन अभ्यासात अत्यंत हुशार होती, असं सैफुद्दीनने सांगितलं.
दहावीपासूनच सैफुद्दीन तिच्यावर प्रेम करत होता. सैफुद्दीन आणि हसीन यांच्या दोन मुली आहेत, एक दहावीत, तर दुसरी सहावीत शिकते.
'हसीनने मला का सोडलं ते माहित नाही. मात्र ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला आहे. सध्या आमच्यात कोणताही संपर्क नाही' असंही शेख सैफुद्दीनने सांगितलं.