Nitish Kumar Reddy : जेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली तेव्हा अनेकांच्या त्याच्या निवडीवर शंका उपस्थित केली होती. हा कोण असाच प्रश्न निर्माण करण्यात आली. मात्र, त्याच अवघ्या एकवीस वर्षीय नितीश कुमार रेड्डीनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियासाठी मसिहा ठरला. नितीशने एमसीजीवरील पहिल्याच खेळीमध्ये तडाखेबाज शतकाची नोंद केली. त्यामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेतून बाहेर पडली आहे. टीम इंडिया अडचणीत असताना नितेश कुमार रेड्डीनं सातत्याने मालिकेमध्ये दमदार खेळी केली आहे. मात्र, त्याचं आजचं पहिलंवहिलं शतक संकटात सापडलं होतं. मात्र, डीएसपी मोहम्मद सिराज त्याच्या मदतीसाठी धावून आला. त्याने केलेल्या तीन चेंडूतील मास्टर क्लास डिफेन्समुळे नितीशला एमसीजीवरील आणि क्रिकेट कारकिर्दीमधील पहिल्या शतकाची नोंद करता आली.
आणि मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली
आज चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वाॅशिंग्टन सुंदर आणि निती कुमार रेड्डी यांनी दमदार खेळी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. वॉशिंग्टन सुंदर 50 धावांवर बाद झाला. त्यामुळे 99 धावांवर नाबाद असलेला नितीश संकटात सापडला होता. 111व्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर वाॅशिंग्टन सुंदर बाद झाला. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली.
नितीशच्या शतकाचा मार्ग प्रशस्त करून दिला
त्यानंतर 112 वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला. त्याने बुमराहला तिसऱ्या चेंडूवर बाद करत टीम इंडियाला नववा धक्का दिला. त्यामुळे पुन्हा काळजाचा ठोका चुकला. 11व्या क्रमांकावर आलेल्या सिराजवर कमिन्सचे तीन चेंडू खेळण्याचे खडतर आव्हान होते. मात्र, मोहम्मद सिराजने तीन चेंडू अगदी मास्टर क्लास पद्धतीने डिफेन्स करत एक प्रकारे नितीशच्या शतकाचा मार्ग प्रशस्त करून दिला. यावेळी एमसीजीवर टाळ्या वाजवून दाद देण्यात आली. त्यानंतर 113व्या षटकात चौकार मारत नितीशने आपलं शतक पहिलं पूर्ण केलं. त्यामुळे अविस्मरणीय खेळीचा साक्षीदार होण्याचा मान सुद्धा मोहोम्मद सिराजला त्याच्या मास्टर क्लास डिफेन्सने मिळाला.
नितीशकुमार रेड्डी क्रीझवर आले तेव्हा भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 191 धावा होत्या आणि फॉलोऑनचा धोका होता. पण नितीशच्या धाडसी खेळीने भारताला संकटातून सोडवले. नितीश आणि वॉशिंग्टन सुंदरने आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे फॉलोऑन वाचवण्यात रोहित ब्रिगेडला यश आले.
नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पर्थ कसोटीत पदार्पणातच नितीशने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. नितीशने पर्थ कसोटीत 41 आणि 38* धावा केल्या होत्या. यानंतर त्याने ॲडलेड कसोटीतही दोन्ही डावात 42-42धावा केल्या. गाबा टेस्टमध्ये नितीशच्या बॅटमधून 16 धावा आल्या, त्या खूप मोलाच्या होत्या. त्यानंतर नितीशने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करून भारताला फॉलोऑन वाचवण्यास मदत केली. मात्र, पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही नितीशला मेलबर्न कसोटीसाठी वगळले जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण भारतीय संघ व्यवस्थापनाचा या युवा खेळाडूवर विश्वास कायम होता. आता 21 वर्षीय नितीशने मेलबर्न कसोटीत चमकदार कामगिरी करून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या