VIDEO : महेंद्रसिंह धोनीचा साक्षीसमोर भन्नाट डान्स!
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2017 01:16 PM (IST)
मैदानावर कायम कूल दिसणारा धोनी मैदानाबाहेर तितकाचा मजा-मस्ती करणारा आहे. धोनी आपली पत्नी साक्षीसमोर भन्नाट डान्स करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आपल्या मैदानावरील कारनाम्यानं अनेकदा सुखद धक्के दिले आहेत. कर्णधार असताना त्याने घेतलेले निर्णय किंवा विकेटकीपिंग करताना चपळाईनं केलेले स्टम्पिंग किंवा रनआऊट असो. सारं काही अफलातून. पण आता धोनीचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. मैदानावर कायम कूल दिसणारा धोनी मैदानाबाहेर तितकाचा मजा-मस्ती करणारा आहे. धोनी आपली पत्नी साक्षीसमोर भन्नाट डान्स करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे धोनीचा नवा अवतार त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओबाबत फार काही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ नेमका कुणी शूट केला आहे याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओमध्ये धोनी पत्नी साक्षीसमोर डान्स करत असल्याचं दिसतं आहे. धोनीचा हा डान्स पाहून साक्षीला देखील आपलं हसू लपवणं फार कठीण गेलं. VIDEO :