Lionel Messi on Retirement : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनल मेस्सीने (Lionel Messi) निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्याने "आपण करिअरमध्ये सर्व काही मिळवले आहे. आता काहीच मिळवण्यासारखं नाही'', असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, मागील कित्येक वर्ष तो वाट पाहत असलेली फिफा विश्वचषकाची ट्रॉफी (Fifa World Cup 2022) देखील त्याने अर्जेंटिनाला जिंकवून दिली होती. ज्यामुळे तो आता निवृत्ती घेऊ शकतो.
लिओनेल मेस्सी हा सात वेळा बॅलोन डी'ओर पुरस्कार विजेता आहे. हा फुटबॉलमधील सर्वात महान पुरस्कार आहे. याशिवाय त्याच्याकडे चॅम्पियन्स लीगपासून ला लीगा ट्रॉफीपर्यंत अनेक विजेतेपदं आहेत. 2021 मध्ये, त्याने आपल्या देशाला प्रथमच कोपा अमेरिका जिंकवून दिला. त्याच्या नावावर केवळ विश्वचषक ट्रॉफी नव्हती, ती इच्छाही त्यानं गेल्याच वर्षी पूर्ण केली. फिफा विश्वचषक 2022 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही मेस्सीला निवडण्यात आलं.
काय म्हणाला मेस्सी?
मेस्सी म्हणाला, 'मी माझ्या कारकिर्दीत सर्व काही मिळवलं आहे. माझ्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा हा (वर्ल्ड कप ट्रॉफी) एक अनोखा मार्ग होता. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत हे सगळं घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. विशेषतः हा क्षण जगणं (वर्ल्ड कप विजय) अप्रतिम होतं. आम्ही कोपा अमेरिका जिंकली आणि त्यानंतर विश्वचषकही जिंकला. आता काहीच शिल्लक नाही.'
मेस्सीला त्याच्या देशाचा माजी दिग्गज माजी फुटबॉलर डिएगो मॅराडोना आवडत होता. मॅराडोनालाही मेस्सी आवडत होता. मॅराडोना यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. या दिग्गज खेळाडूची आठवण करून देताना मेस्सी म्हणाला, 'मला डिएगो मॅराडोनाकडून विश्वचषकाची ट्रॉफी घ्यायला आवडली असती किंवा किमान ते हा क्षण बघू शकले असते.'
रोमहर्षक होती फिफा विश्वचषकाची फायनल
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :