दुबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वन डे रँकिंगमध्ये त्याचं स्थान आणखी मजबूत केलं आहे. यासोबतच त्याने सर्वाधिक रेटिंग पॉईंटमध्ये टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचीही बरोबरी केली.

विराटचा जबरदस्त फॉर्म श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही कायम होता. वन डेतील 30 शतकं पूर्ण करत सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीतही तो रिकी पाँटिंगसोबत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

विराटने आयसीसी वन डे रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरवर 12 अंकांहून 26 अंकांनी बढत मिळवली. विराटच्या खात्यात सध्या 887 गुण आहेत. सचिनने 1998 साली आयसीसी वन डे रँकिंगमध्ये 887 गुण मिळवले होते. भारतीय फलंदाजाने मिळवलेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक गुण आहेत. विराटने या विक्रमाची बरोबरी केली.

रोहित शर्मा आणि धोनीचं टॉप 10 मध्ये पुनरागमन

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे रोहित शर्मा आणि मालिकेत 162 धावा करणारा महेंद्रसिंह धोनी यांनी टॉप 10 फलंदाजांमध्ये पुनरागमन केलं आहे. रोहित शर्माने नववं, तर धोनीने दहावं स्थान मिळवलं आहे.

संबंधित बातम्या :

बुमराला गाडी मिळाली, सर्वांना टपावर घेऊन धोनीने पळवली!


विराट लवकरच शतकांचा बादशाह सचिनलाही मागे टाकणार?


श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर 5-0 ने मात देणारा भारत एकमेव संघ!


सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!


क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा


वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!