नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटर मोहम्मद कैफला आपल्या सूर्यनमस्कार करतानाच्या फोटोंमुळे ट्विटर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कैफने सूर्यनमस्कार करतानाचे फोटो ट्विटरला शेअर केले. त्यानंतर काही फॉलोअर्सने त्यावर टीका केली.


https://twitter.com/MohammadKaif/status/815032700969041920

सूर्यनमस्कार करणाऱ्या कैफवर काही जणांनी धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला. तर काहींनी कैफचं समर्थन केलं. अखेर कैफलाच यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

https://twitter.com/MohammadKaif/status/815114036262162432

व्यायामाने सर्वांना फायदाच होतो. याचा कोणत्या धर्माशी काहीही संबंध नाही, असं प्रत्युत्तर कैफने दिलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने पत्नीसोबतचे फोटो ट्विटरला शेअर केल्याने काहींनी त्यावर टीका केली होती. शमीने स्वतः यावर आपलं मतही मांडलं होतं.

पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर