नवी दिल्ली : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. तर परदेशातील कसोटी दौऱ्यांसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून राहुल द्रविड आणि गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची नियुक्ती करण्यात आली. आता आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी क्षेत्ररक्षण सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉण्टी ऱ्होड्सचं नाव चर्चेत आहे.
आर. श्रीधर हे टीम इंडियाचे पूर्ण वेळ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात. तर रवी शास्त्रींसोबत क्षेत्ररक्षण सल्लागार म्हणून जॉण्टी ऱ्होड्सला विचारणा केली जाऊ शकते, असं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
याचप्रमाणे इंग्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जेसन गिलेस्पीचंही मार्गदर्शन टीम इंडियाच्या गोलंदाजांना मिळावं, याचा विचार बीसीसीआय करत आहे. गिलेस्पीकडे इंग्लंडमधील परिस्थितीचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे 40 दिवसांसाठी त्याला करारबद्ध केलं जाऊ शकतं, असं वृत्त आहे.
परिस्थिती पाहून बीसीसीआयकडून दक्षिण आफ्रिकेत फॅनी डिव्हीलिअर्ल आणि मायदेशात झहीर खानचा विचार केला जाऊ शकतो. झहीर सध्या केवळ परदेश दौऱ्यांसाठीच टीम इंडियासोबत असेल.
टीम इंडियाच्या ताफ्यात आता नव्याने कुणाचा समावेश होतो, ते पाहण महत्वाचं असणार आहे. कारण रवी शास्त्री यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणू भरत अरुण यांची मागणी केली आहे. तर संजय बांगर फलंदाजी प्रशिक्षक आणि आर. श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये असतील. तर परदेश दौऱ्यांसाठी जेलन गिलेस्पीचं नाव चर्चेत आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जॉण्टी ऱ्होड्स टीम इंडियाचा क्षेत्ररक्षण सल्लागार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 01:23 PM (IST)
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी क्षेत्ररक्षण सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉण्टी ऱ्होड्सचं नाव चर्चेत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -