Javed Akhtar on Virat Kohli :  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. नाबाद शतक झळकावणारा टीम इंडियाचा किंग विराट कोहली सामनावीर ठरला. 242 धावांचे टार्गेट सहज गाटत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. किंग कोहलीच्या शतकी खेळीनंतर देशातील रथी महारथींनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विट करत विराटच्या शतकाचे सेलिब्रेशन केले. गीतकार जावेद अख्तर नेहमीच आपल्या बेधडक भूमिकांनी प्रसिद्ध आहेत. मुंबईवरील 26/11 हल्ल्यावर त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये थेट लाहोरमध्ये पाकिस्तानचा माज उतरवत आरसा दाखवून दिला होता. किंग कोहलीने शतकी सेलिब्रेशननंतर जावेद अख्तर यांनी ट्विट करत विराटच्या खेळीचे कौतुक केले. 

विराट कोहली जिंदाबाद 

जावेद अख्तर यांनी ट्विट करत विराट कोहली जिंदाबाद! आम्हाला तुझा खूप खूप अभिमान असल्याचे ट्विट केले. जावेद अख्तर यांचे ट्विट सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले. 

लाहोरमध्ये काय म्हणाले होते जावेद अख्तर? 

जावेद अख्तर लाहोरमधील त्या कार्यक्रमात म्हणाले की, 'आम्ही मुंबईचे लोक आहोत. आमच्या शहरावर कसा हल्ला झाला ते आम्ही पाहिले, ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. ही तक्रार जर एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर तुम्हाला वाईट वाटू नये, जावेद अख्तर यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांबद्दलही सांगितले. ते म्हणाले की आम्ही नुसरतसाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत, आम्ही मेहंदी हसनसाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम नव्हता. यावर पाकिस्तानीही टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. वास्तव हे आहे की, आपण एकमेकांना दोष देऊ नये.

अमित शाह म्हणाले, उत्कृष्ट कामगिरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि लिहिले की स्फोटक कामगिरी! टीम इंडियाने शानदार खेळ केला आणि करोडो क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. आगामी सामन्यांसाठी माझ्या शुभेच्छा.

राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय संघाच्या विजयावर आनंद व्यक्त करताना त्यांच्या अधिकृत X हँडलवर लिहिले की टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! टीमवर्क आणि स्पिरीटचे शानदार प्रदर्शन, ज्यामध्ये कोहलीच्या शतकाने विजयाचा पाया घातला. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले. तो म्हणाला की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या जोरदार विजयामुळे मी खूप आनंदी आहे. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

भारतासाठी सहज विजय, पाकिस्तानसाठी त्रास

भारताने पाकिस्तानला 241 धावांवर ऑलआउट केले होते, ज्यामुळे ते पूर्ण 50 ओव्हर्सही खेळू शकले नाहीत. त्याचवेळी भारताने 45 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीने भारताला मजबूत स्थितीत नेले. श्रेयार अय्यरनेही उत्कृष्ट खेळी केली. या पराभवामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. सलग दोन सामने गमावून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी अ गटात तळात पोहोचला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या