मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अखेर आज विवाहबंधनात अडकणार आहे. टीव्ही अँकर आणि प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी बुमराहने लग्नगाठ बांधणार आहे. गोव्यातील एका सुरेख ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या धर्तीवर संजना आणि जसप्रीत या दोघांच्याही कुटुंबातून ठराविक मंडळींचीच या विवाहसोहळ्यासाठी उपस्थिती असणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही टीकून असल्यामुळं त्या धर्तीवर या विवाहसोहळ्यातही काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करण्यात आल्याचं कळत आहे. पण, लग्नसोहळ्यामध्ये मोबाईल वापरांबाबत काही निर्बंध आहेत. आपल्या जीवनातील या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत यासाठी दोघांनी विवाहस्थळी मोबाईल वापरास बंदीचा आग्रह धरल्याचं कळत आहे.
मागील वर्षापासूनच संजना आणि जसप्रीत बुमराहच्या नात्याची चर्चा पाहायला मिळाली होती. आयपीएलच्या एका फॅन शोमध्येही तिचा सहभाग होता. सूत्रांच्या माहितीनुसार संजनानं 2012 मध्ये सिम्बायोसिस या संस्थेतून बीटेकचं शिक्षण घेतलं. यानंतर वर्षभरासाठी तिनं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही काम पाहिलं.
2014 मध्ये तिनं मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.