India vs Australia 2023 World Cup Final : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडिया नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आली. भारतीय संघाने 50 षटकात 240 धावा केल्या. पॅट कमिन्सच्या संघासमोर 241 धावांचे लक्ष्य आहे. भारतीय फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे धावा करता आल्या नाहीत, पण भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला असून सामन्यात रंगत निर्माण केली आहे. शमीने वाॅर्नरला बाद केल्यानंतर बुमराहने पम घातक गोलंदाजी करत मार्श आणि स्मिथला बाद केले. 


या विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली आहे. विशेषत: टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज तुटून पडले आहेत. फिरकीपटूंनीही यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्यांदा विश्वविजेता बनवण्याची जबाबदारी गोलंदाजांच्या खांद्यावर आली आहे.


भारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी


या विश्वचषकात मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी पहिल्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत मोहम्मद शमीने विरोधी संघाचे 24 फलंदाज बाद केले आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह हा या यादीत मोहम्मद शमीनंतर दुसरा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत जसप्रीत बुमराहने विरोधी संघातील 20 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. याशिवाय कुलदीप यादवने 15 विकेट घेतल्या आहेत. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज आपली प्रतिभा दाखवू शकतील का?