जमैका : जमैका कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास 43 षटकांचा खेळ वाया गेला. त्याआधी भारताने आपला पहिला डाव 9 बाद 500 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला विंडीजवर 304 धावांची आघाडी मिळाली.


 

भारताकडून अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावलं. रहाणेने 237 चेंडूंत नाबाद 108 धावांची खेळी केली. तर रिद्धिमान साहाने 47 आणि अमित मिश्राने 21 धावा केल्या.

 

चहापानाआधी भारताने आपला डाव घोषित केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही काळासाठी पावसाने विश्रांती घेतली होती. पण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी तासाभराचा अवधी शिल्लक असताना पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली.

 

दरम्यान वेस्ट इंडिजसाठी रोस्टन चेसने 121 धावांच्या मोबदल्यात भारताच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं.