Yuzvendra Chahal RJ Mahvash Relationship : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने काही आठवड्यांपूर्वी धनश्री वर्माशी (Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce) घटस्फोट घेतला. त्यानंतर चहलचे नाव आता आरजे महावशशी जोडल्या जात आहे. अलीकडेच ती मैदानावर पंजाब किंग्जला पाठिंबा देताना दिसली होती, त्याच संघाकडून चहल आयपीएल 2025 मध्ये खेळत आहे. दरम्यान,  तिने चहलसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांना उधाण आले. आता आरजे महावशचा (RJ Mahvash) एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या सेक्स लाईफबद्दल बोलत आहे. 

युजवेंद्र चहलची खास मैत्रिण आरजे महावश (RJ Mahvash) काय म्हणाली?

या व्हिडिओमध्ये आरजे महावश म्हणाला, "मी त्या व्यक्तीसोबत 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आधी मी त्याला 3 वर्षे डेट केले आणि तो 3 वर्षे माझा मंगेतर होता. मी त्याच्यासोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत, कारण मला असे वाटत होते की लग्नानंतरच शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे. मी फक्त एवढेच म्हणेन की ही भावना नाही तर लग्नानंतर पूर्ण करायची जबाबदारी आहे."

युजवेंद्र चहलसोबतचा फोटो व्हायरल 

गेल्या मंगळवारी पंजाब किंग्जने त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा 18 धावांनी पराभव केला. त्या सामन्यानंतर, आरजे महावशने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,'आपल्या माणसांच्या वाईट काळात त्यांची साथ देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी! आम्ही सगळे तुझ्यासाठी इथे जमलो आहोत. हे कॅप्शन पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली की महावशने (Yuzvendra Chahal RJ Mahvash Relationship) चहलसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली आहे. तसेच, चहलसोबतचा फोटो शेअर केल्याने त्यांच्या डेटिंगच्या अटकळींना आणखी हवा मिळाली आहे.

हे ही वाचा -

Yuzvendra Chahal with RJ Mahvash : तू मेरा हुकुम का इक्का... युजवेंद्र चहलच्या 'त्या' पोस्टमुळे उडाली खळबळ! RJ महावशसोबत दिली प्रेमाची कबुली?