Who is Vignesh Puthur Mumbai Indians Player : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहित शर्माच्या जागी दुसऱ्या डावात इम्पॅक्ट प्लेयर खेळाडू म्हणून आलेल्या 'अनकॅप्ड' खेळाडू विघ्नेश पुथूरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर वापर केला आणि त्याचे आयपीएल पदार्पण संस्मरणीय बनवले. 155  धावांचा बचाव करत असताना आठव्या षटकात कर्णधार सूर्यकुमारने पुथूरला गोलंदाजी सोपवली. विघ्नेशने सीएसके कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपात आयपीएलमध्ये पहिला विकेट घेतली. त्यानंतर त्याने स्फोटक फलंदाज शिवम दुबेला (9) गुगली फसवले.






राहुल त्रिपाठीच्या विकेटनंतर, ऋतुराज गायकवाड आणि रचिन यांनी 67 धावांची भागीदारी केली होती, ज्यामुळे सीएसकेला या सामन्यावर मजबूत पकड मिळाली होती. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विघ्नेश पुथूरने मुंबई इंडियन्ससाठी 3 विकेट्स घेतल्या. आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने ऋतुराज गायकवाड (53) ला झेलबाद केले. ही त्याची आयपीएलमधील पहिलीच विकेट आहे. त्यानंतर त्याने 10 व्या षटकात शिवम दुबे (9) ला बाद केले. विघ्नेश पुथूरने नंतर दीपक हुड्डाला आऊट करून अजून एक धक्का दिला. तो फक्त तीन धावा करू शकला. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने विघ्नेश पुथूरला 30 लाख रुपयांना खरेदी केले. 


विघ्नेश पुथूर अद्याप खेळला नाही देशांतर्गत क्रिकेट...


रोहित शर्माच्या जागी त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संधी मिळाली. हा क्रिकेट मूळचा केरळचा आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या हंगामात तो अ‍ॅलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता. त्या स्पर्धेत पुथूरने फक्त तीन विकेट्स घेतल्या, परंतु मुंबई इंडियन्स स्काउट्सचे लक्ष त्याने वेधून घेतले.


विघ्नेश पुथूरने अद्याप देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघाकडून खेळलेला नाही. पण, पण मुंबई इंडियन्सच्या संघानं त्याला हेरलं अन् या पठ्ठ्यानं आपल्यातील धमक दाखवत मैदानही गाजवलं. आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले. हा केरळमधील रिक्षा चालकाचा मुलगा आहे. स्थानिक क्रिकेटमधील एका संघात खेळताना मुंबई इंडियन्सच्या शोध पथकानं या हिऱ्याला हेरलं आहे. आणि आज विघ्नेशच्या आयपीएलमधील पदार्पणाच्या कामगिरीनंतर त्याने झटक्यात प्रसिद्धी मिळवली.