Chinnaswamy Stadium Stampede : बंगळुरुमध्ये मृत्यूचा तांडव! 35 हजारांची क्षमता, पण 3 लाखांच्या गर्दीचा लोंढा अन्... एअरपोर्ट ते चिन्नास्वामी स्टेडियम नेमकं काय घडलं? A टू Z
RCB Victory Parade in Bengaluru News : प्रशासन आणि पोलिस यंत्रणा देखील या अनपेक्षित गर्दीपुढे हतबल ठरले आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 47 जण जखमी झाले.

Chinnaswamy Stadium Stampede Update News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) ऐतिहासिक आयपीएल 2025 विजयानंतर संपूर्ण बंगळुरू शहर जल्लोष साजरा करत होता. मात्र या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेली घटना काळीज हादरवणारी ठरली. स्टेडियमची एकूण आसनक्षमता फक्त 35,000 इतकी असताना, तब्बल 3 लाख चाहत्यांचा गर्दीचा लोंढा स्टेडियमच्या दिशेने निघाला. विजय साजरा करण्यासाठी लाखो चाहते स्टेडियमबाहेर एकत्र आले. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Visuals from outside Chinnaswamy Stadium, where a stampede took place today, claiming the lives of 11 people and injuring 33 people pic.twitter.com/LKT20x1ofz
— ANI (@ANI) June 4, 2025
पोलिस यंत्रणा हतबल...
प्रशासन आणि पोलिस यंत्रणा देखील या अनपेक्षित गर्दीपुढे हतबल ठरले. अनेकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. गेट तोडण्यात आले, बॅरिकेड्स तोडले गेले आणि एकाच वेळी हजारो लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना परिस्थिती गंभीर बनली. यामध्ये चेंगराचेंगरी झाली, काहींना श्वास घेणेही कठीण झाले आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 47 जण जखमी झाले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हळहळला. त्यामुळे बंगळुरु एअरपोर्ट ते चिन्नास्वामी स्टेडियम नेमकं काय घडलं? यावर नजर टाकूया...
बंगळुरु एअरपोर्ट ते चिन्नास्वामी स्टेडियम नेमकं काय घडलं?
दुपारी 3 वाजता - आरसीबी टीम बंगळुरु विमानतळावर दाखल, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून टीमचं स्वागत केले.
#WATCH | Bengaluru: #RoyalChallengersBengaluru star player Virat Kohli received by Karnataka Deputy CM DK Shivakumar at the airport
— ANI (@ANI) June 4, 2025
#RoyalChallengersBengaluru clinched their first #IPL trophy yesterday after defeating Punjab Kings
(Source: Office of DK Shivakumar) pic.twitter.com/dMlM7aUezg
दुपारी 3.30 वाजता - आरसीबी टीमच्या दोन बसेस सुरक्षेच्या वेढ्यात हॉटेल ताज वेस्ट एन्डमध्ये, त्यावेळी फॅन्सचीही मोठी गर्दी होती.
#WATCH | Bengaluru, Karnataka | #IPL2025 champions #RoyalChallengersBengaluru leaves for Vidhana Soudha, where they will be felicitated by the Karnataka government. #RoyalChallengersBengaluru clinched their first #IPL trophy yesterday after defeating Punjab Kings. pic.twitter.com/hm4PJDo0YD
— ANI (@ANI) June 4, 2025
दुपारी 3.30 नंतर - चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी, स्टेडियम प्रशासन, पोलिसांचा नियोजनाचा अभाव, स्टेडियमचे दरवाजे बंद ठेवले, गर्दी वाढतच गेली.
सायंकाळी 4.45 वाजता - आरसीबीच्या दोन बसेस हॉटेल ताजमधून कर्नाटक विधानसभेकडे रवाना, रस्त्यावर फॅन्सची मोठी गर्दी होती
#WATCH | A car was damaged after fans climbed over it outside the M Chinnaswamy Stadium in Bengaluru
— ANI (@ANI) June 4, 2025
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have turned up here to catch a glimpse of their champion team.
A special felicitation ceremony for all RCB players has been… pic.twitter.com/WuNrbo5Bzh
सायंकाळी 5 वाजता - कर्नाटक विधानसभेत आरसीबी टीमचा सत्कार सुरु झाला, संपूर्ण टीमसह कर्नाटक सरकारचे प्रमुख नेते उपस्थित होते, विधानसभेच्या आवारातही फॅन्सची मोठी गर्दी होती.
#WATCH | Karnataka police use mild force to manage the crowd outside M Chinnaswamy Stadium in Bengaluru
— ANI (@ANI) June 4, 2025
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have arrived here to catch a glimpse of their champion team. pic.twitter.com/rnBSTx8vEN
सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी - स्टेडियम बाहेरील गर्दीचा संयम सुटला, स्टेडियमच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडून, भिंतींवरुन, झाडांवरुन कारवर चढून आत जाण्याचा चाहत्यांचा प्रयत्न केला.
#WATCH | #RoyalChallengersBangalore team with the #IPL2025 trophy at M Chinnaswamy Stadium in Bengaluru pic.twitter.com/I9WQwkEDvf
— ANI (@ANI) June 4, 2025
संध्याकाळी 6 च्या सुमारास - आरसीबी टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये, बाहेर सुरु असलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारावेळी आतमध्ये हजारो फॅन्सच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाला.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Visuals from outside Chinnaswamy Stadium, where the slippers and shoes are scattered. A stampede occurred here, claiming the lives of 11 people and injuring 33 people. pic.twitter.com/5DBhW9IFli
— ANI (@ANI) June 4, 2025





















