Wankhede Crowed Booed Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. गुजरात आणि हैदराबादमधील पहिल्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याला हूटिंग करण्यात आले होते. मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना वानखेडेवर खेळत आहे, या सामन्यातही हार्दिक पांड्याविरोधात जोरदार बूइंग झालं. चाहत्यांकडून रोहित रोहितच्या घोषणा देण्यात आल्या. चाहत्यांना शांत करण्यासाठी समालोचक संजय मांजरेकर यांना हस्तक्षेप करावा लागला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यात वानखेडे येथे सुरु असलेल्या सामन्यावेळी हा प्रसंग घडला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


हार्दिक पांड्या वानखेडेनवर नाणेफेकीसाठी आला होता. नाणेफेकीवेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग करण्यात आले. या सामन्याआधीच वानखेडेवर हार्दिक पांड्याला हूटिंगचा सामना करावा लागेल, असं म्हटलं जात होतं. सामना सुरु झाल्यानंतरच चाहत्यांनी हार्दिक पांड्याला हूटिंग केले. संजय मांजरेकर यांना हस्तक्षेप करत भान राखा असं ओरडणाऱ्या चाहत्यांना सांगावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.







मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, अशी भीती आधीच व्यक्त करण्यात आली होती. अन् झालेही तसेच. हार्दिक पांड्या नाणेफेकीला आल्यानंतर चाहत्यांकडून हूटिंग करण्यात आलं. नाणेफेकीवेळी चाहत्यांनी रोहित रोहित आशा घोषणाबाजी केली. चाहत्यांचा आवाज आणि या घोषणा पाहून समालोचन करणारे संजय मांजरेकर यांनी शांत राहा असे सांगितलं. झालं असं की, नाणेफेकीवेळी संजय मांजरेकरांनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच चाहत्यांकडून रोहित रोहित अशा घोषणा सुरु झाल्या. हार्दिक पांड्याला चाहत्यांनी बूइंग करण्यास सुरुवात केल्यानंतर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मांजरेकर यांनी चाहत्यांना ‘चांगलं वागण्यास’ सांगितलं. नाणेफेकीच्या वेळी मांजरेकर म्हणाले, ” मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत”, ज्यानंतर प्रेक्षकांनी हूटिंग करण्यास सुरुवात केली. यावर मांजरेकर यांनी चाहत्यांना, उत्तर देताना ‘चांगलं वागा’ असा सल्ला दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.