Virat Kohli Slow Knock Against DC : दिल्लीने एकतर्फी सामन्यात आरसीबीचा सात विकेटने पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबद्लायत  181 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल दिल्लीने हे आव्हान 20 चेंडू आणि सात विकेट राखून सहज पार केले. दिल्लीच्या विजयात फिल साल्ट याचे मोठे योगदान होते. पण आरसीबीच्या पाराभवानंतर त्याची कारणे शोधली जात आहेत. नेटकऱ्यांनी आरसीबीच्या पराभवाचे प्रमुख कारण विराट कोहली असल्याचे म्हटलेय. विराट कोहलीने दिल्लीविरोधात संथ फलंदाजी केली, त्यामुळेच आरसीबीची धावसंख्या कमी झाली, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांच्या या आरोपात तथ्यही दिसत आहे.


विराट कोहलीने ४५ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. विराटचा स्ट्राईक रेट फक्त १२० इतका होता. विराट कोहलीला ४६ चेंडूत एकही षटकार लगावता आला नाही. विराट कोहलीने एकेरी आणि दुहेरी धावसंख्या केली. त्यामुळे विराट कोहलीची संथ खेळी दिल्लीच्या पथ्थ्यावर पडल्याचे बोलले जातेय. विराट कोहलीच्या संथ खेळीमुळे आरसीबी २०० पर्यंत पोहचू शकला नाही. 


विराट कोहलीसोबत सलामीला आलेला डु प्लेसिस याने वेगाने धावा काढल्या. दहा षटकात आऱसीबीने ८० धावांचा पल्ला पार केला होता. यामध्ये फाफ याचे योगदान ६० टक्के होते. फाफ बाद झाल्यानंतर मॅक्सवेलनेही विकेट फेकली. त्यानंतर विराट कोहलीची फलंदाजी आणखी संथ झाली. विराट कोहली दबावात गेल्याचे दिसते. विराट कोहली संथ फलंदाजी करत अशताना महिपाल लोमरोर याने २०० च्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या.. विराट १२० च्या स्ट्राइक रेटनेच खेळत होता. महिपाल लोमरोर याने वेगाने धावा काढल्यामुळे आरसीबी १८१ पर्यंत पोहचली.  आरसीबीला २० ते २५ धावा कमी पडल्या..


दिल्लीचा सलामी फलंदाज फिल साल्ट याने सुरुवातापूसन आक्रमक फलंदाजी केली. साल्ट याने ४५ चेंडूत ८७ धावांचा पाऊस पाडला. साल्ट याने विरा कोहलीपेक्षा एक चेंडू जास्त खेळला अन् ३२ धावा जास्त काढल्या. दोन्ही संघामध्ये हाच फरक दिसला. विराट कोहलीने आक्रमक कसे खेळायचे हे साल्टकडून शिकायला हवे, असे नेटकऱ्यांनी म्हटलेय.