Virat Kohli 100th T20 Fifty : रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli IPL record) टी20 क्रिकेटमधील 100 व्यांदा 50 पेक्षा जास्त धावांचा पराक्रम केला आहे. पंजाब किंग्सच्या विराधोत एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर विराट कोहलीनं अर्धशतक ठोकले आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त धावा 100 वेळा ठोकणारा विराट कोहली आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये 100 व्यांदा 50 धावांचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा पल्ला पार केला होता. 


विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये 100 व्यांदा 50 पेक्षा जास्त धावा चोपण्याचा रेकॉर्ड केला आहे. पंजाबविरोधात झालेल्या चिन्नस्वामी स्टेडियमवरील सामन्यात कोहलीने विराट विक्रम केला आहे.  विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात शतके ठोकली आहेत, त्याशिवाय आंतरष्ट्रीय टी 20 मध्ये विराट कोहलीच्या नावावर एका शतकाची नोंद आहे. 






विराट कोहलीचं टी 20 क्रिकेट करियर - 


विराट कोहलीने आतापर्यंत 377 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्याचा समावेश आहे. विराट कोहलीने  360 डावात फलंदाजी करताना 134 च्या स्ट्राईक रेटने 12050 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 91 अर्धशतकं आणि आठ शतकं निघाली आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 इतकी आहे.  






 विराट कोहलीची शानदार फलंदाजी - 


पंजाबविरोधात विराट कोहलीने शानदार 77 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. विराट कोहलीने 49 चेंडूमध्ये 77 धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीच्या या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकारांचा साज होता.