Virat Kohli-Musheer Khan VIDEO: अरे हा पाणी पाजत होता...; कोहलीकडून मुशीन खानचा अपमान?, सोशल मीडियावर 'विराट' ट्रोल
Virat Kohli-Musheer Khan Video IPL 2025: एक व्हिडीओवरुन बंगळुरुचा फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत.

Virat Kohli-Musheer Khan Video IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरुने एकतर्फी विजय मिळवत 8 विकेट्स पंजाबचा पराभव केला. या विजयासह बंगळुरुचा संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडीओवरुन बंगळुरुचा फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत.
पंजाबकडून 20 वर्षीय मुशीर खानने आयपीएलमध्ये पदापर्ण केले. पंजाबने 60 धावांवर 6 विकेट्स गमावल्यानंतर मुशीन खान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात फलंदाजीसाठी उतरला. यावेळी विराट कोहलीने मुशीर खानची खिल्ली उडवल्याचे दिसून आले. दरम्यान मुशीर खान हा टीम इंडियाकडून खेळणाऱ्या सरफराज खान याचा लहान भाऊ आहे.
नेमकं काय घडलं?, Video: (Virat Kohli-Musheer Khan Water Boy Video)
आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 1 सामन्यात, विराट कोहलीने मुशीर खानला "ये अभी पानी पिला रहा था" असे म्हणत "वॉटर बॉय" म्हणून संबोधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर विराट कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, काही चाहते विराट कोहलीच्या मदतीला धावले. फलंदाजीसाठी येण्याआधी मुशीर खान टाईमआऊटदरम्यान मैदानात असणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांसाठी पाणी घेऊन आला होता. त्यामुळे काही मिनिटांआधी मुशीर खान मैदानात पाणी घेऊन आला, आणि आता फलंदाजी करतोय, असं विराट कोहलीला म्हणायचे होते, असं काही नेटकरी म्हणत आहे.
View this post on Instagram
मुशीर खानची कारकीर्द-
मुशीरला पंजाब किंग्सने 2025 च्या आयपीएल लिलावात 30 लाख रुपयांना खरेदी केले. मुशीरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात लहान वयातच केली. त्याने गिल्स शील्ड अंडर-14 स्पर्धेत खेळ केला आणि 8 वर्षांच्या वयात कंगा लीगमध्ये सहभागी झाला, जिथे त्याने युवराज सिंगचा बळी घेतला होता. त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने माचो क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतले. 2024 च्या अंडर-19 विश्वचषकात, मुशीरने 7 सामन्यांत 360 धावा आणि 7 बळी घेतले, ज्यामुळे तो स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्याधारक ठरला. त्याने न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्ध शतके झळकावली. मुशीर खानचा क्रिकेटमधील प्रवास अजून सुरूवातीच्या टप्प्यात आहे, परंतु त्याच्या अष्टपैलू कौशल्यामुळे तो भविष्यात भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
बंगळुरुचा अंतिम सामन्यात प्रवेश-
पंजाब किंग्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना 101 धावांवर सर्वबाद झाले. जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी 3 विकेट्स आणि यश दयालने 2 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 8 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने 3 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. तर पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मुंबईविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना जिंकावा लागेल.





















