एक्स्प्लोर

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, आत आरसीबीचं 10 मिनिटं सेलिब्रेशन, विराट कोहलीनं काय म्हटलं? रजत पाटीदारचं कौतुक

RCB Victory Parade: एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या टीमचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विराट कोहलीनं बंगळुरुच्या ऐतिहासिक विजयासंदर्भात काय म्हटलं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

Virat Kohli RCB Victory Celebration:  आयपीएल 2025 चे विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाचं सेलिब्रेशन एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलं होतं. विराट कोहली ज्यावेळी स्टेजवर पोहोचला त्यावेळी हजारो चाहत्यांनी जयघोष केला. विराटला त्याचं मनोगत व्यक्त करताना थांबायला लागलं. 18 वर्षानंतर आरसीबीनं विजेतेपद मिळवल्यानं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. यामुळं आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. विराट कोहलीनं बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदार याचं कौतुक केलं. रजत पाटीदारची ओळख टीमचा लीडर म्हणून करुन दिली. यानंतर रजत पाटीदारनं ट्रॉफी उंचावत बंगळुरुच्या चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं.  

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये असलेल्या हजारो लोकांनी विराट कोहलीला बोलू दिलं नाही. त्यामुळं विराट कोहलीनं या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे, असं म्हटलं. वेळ कमी असल्याचं सांगत विराट कोहलीनं बोलू देण्याचा आग्रह केला.  

विराट कोहली म्हणाला, मी ज्या गोष्टीपासून सुरुवात करु इच्छितो ती म्हणजे ट्रॉफी जिंकल्यानंतर आमच्या कॅप्टननं म्हटलं. आता ई साला कप नामदे नाही तर ई साला कप नामदू झालं आहे. आम्ही करुन दाखवलं आहे. हा विजय फक्त माझा नसून माझ्या सारख्या खेळाडूसाठी नव्हे तर आपल्या सर्वांचा आहे, असं विराट कोहलीनं म्हटलं.  

विराट कोहलीकडून रजत पाटीदारचं कौतुक

रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाचं विराट कोहलीनं कौतुक केलं आहे. विराट कोहली म्हणाला ज्यांच्या नेतृत्त्वात आरसीबीनं पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीनं रजत पाटीदार येत्या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्त्व करत राहील, असं विराट कोहलीनं म्हटलं.  

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोष, बाहेर चेंगराचेंगरी

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम 5 ते 6 या काळात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी मोफत आणि मर्यादित पासेससाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, 15 ते 25 जण जखमी असल्याचं समोर आलं आहे. 

आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषाच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी झाल्यानं आनंदाला गालबोट लागलं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा विजयी जल्लोष सुरु होण्यापूर्वी चेंगराचेंगरी झाली. यामुळं 11 जणांचा मृत्यू झाला. 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटलं की मी पोलीस  आयुक्त आणि इतर सर्व लोकांसोबत चर्चा केली आहे. रुग्णालयात देखील झाणार आहे, सध्या जे जखमींची देखभाल करत आहेत त्या डॉक्टरांना त्रास द्यायचा नाही. सध्या मृतांची अधिकृत संख्या सांगता येणार नाही. लोकांनी शांत राहावं, असं डीके शिवकुमार म्हणाले. कार्यक्रम केवळ 10 मिनिटात संपवण्यात आला. आम्ही स्थिती सामान्य व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. लाखो लोक आले, असं डीके शिवकुमार म्हणाले.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget