Travis Head, IPL 2024 : हैदराबादचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड यानं आरसीबीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ट्रेविस हेड यानं अवघ्या 39 चेंडूमध्ये शतक ठोकलं. हेड यानं पहिल्या चेंडूपासूनच आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. लॉकी फर्गुसन, रीस टॉप्ली, यश दयाल, विजयकुमार वैशाख अन् विल जॅक्स या सर्वच गोलंदाजांचा हेडनं समाचार घेतला. हेड यानं आयपीएलमधील आपलं पहिलं शतक ठोकलं. हैदराबादसाठी हे सर्वात वेगवान शतक ठरलं. तर आयपीएलमधील चौथं वेगवान शतक ठरलं. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेल यानं 30 चेंडूमध्ये शतक ठोकलं. युसूफ पठाण 37, डेविड मिलर 38 चेंडूमध्ये शतक ठोकलं. हेड याच्या शानदार खेळीचा अंत अखेर लॉकी फर्गुसन यानं केला, ट्रेविस हेड 102 चेंडूवर बाद झाला. 






ट्रेविस हेड याच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही . हेड आणि अभिषेक यांनी पहिल्या सहा षटकांमध्येच 76 धावा चोपल्या. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी 8.1 षटकांमध्ये 108 धावांची सलामी दिली. हेड यानं आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. हेड यानं 41 चेंडूमध्ये 102 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये हेड यानं 8 षटकार आणि 9 चौकार ठोकलेत. 


ट्रेविस हेड यानं अभिषेक शर्मासोबत 49 चेंडूमध्ये 108 धावांची भागिदारी केली.  तर क्लासेन याच्यासोबत 26 चेंडूमध्ये 57 धावांची भागिदारी केली. हेडच्या स्फोटक फलंदाजीमुळे हैदराबादने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे.






आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?


फाफ डु प्लेलिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, सौरव चौव्हाण, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोरर, रीस टोप्ली, विजयकुमार वैशाख, लॉकी फर्गुसन, यश दयाल


राखीव खेळाडू - प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्निल, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा


हैदराबादच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोणते शिलेदार ?


ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाद अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन


राखीव खेळाडू - उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, मयांक मार्केंड, राहुल त्रिपाठी