SRH vs GT IPL 2025 : आधी सिराजचा तांडव, नंतर शुभमन गिलच्या 'क्लास'मुळे पॅट कमिन्सला घाम फुटला, गुजरातने हैदराबादचा 7 गडी राखून केला पराभव

SRH vs GT Live Updates IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला जात आहे.

किरण महानवरLast Updated: 06 Apr 2025 11:01 PM

पार्श्वभूमी

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला गेला. गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव...More

गुजरातने हैदराबादचा 7 गडी राखून केला पराभव

गुजरात टायटन्सने एकतर्फी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 153 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चमकदार कामगिरी केली. सुंदरने 29 चेंडूत 49 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. जोस बटलरला खातेही उघडता आले नाही. साई सुदर्शन 5 धावा करून बाद झाला.


प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावा केल्या. यादरम्यान नितीश रेड्डीने 31 धावांची खेळी खेळली. अभिषेक शर्मा 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अनिकेत वर्मा 18 धावा करून बाद झाला. क्लासेन 31 धावांचे योगदान देऊन बाद झाला.


गुजरातकडून मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 बळी घेतले.