एक्स्प्लोर

SRH vs PBKS : हैदराबादचं औषध त्यांनाच दिलं, पंजाबचा धावांचा डोंगर, श्रेयस अय्यरची वादळी फलंदाजी, SRH पुढं किती धावांचं आव्हान?

PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं सनरायजर्स हैदराबाद पुढं धावांचा डोंगर उभा केला आहे. आजच्या मॅचमध्ये हैदराबादला कोणत्याही स्थितीत विजय आवश्यक आहे.

हैदराबाद :  आयपीएलच्या  27 व्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमने सामने आले.  पंजाब किंग्जनं टॉस जिंकून फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला.  पंजाब किंग्जच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. प्रियांश आर्या, प्रभासिमरन सिंह, नेहाल वढेरा, श्रेयस अय्यरनं दमदार फलंदाजी केली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबनं 200 धावांचा टप्पा पार केला. मात्र, पंजाबचे इतर फलंदाज अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकले नाहीत.  शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं 27  धावा दिल्यानं पंजाबचा संघ 245 धावांवर पोहोचला. हैदराबादला विजयासाठी 246 धावा कराव्या लागतील. 

हैदराबाद विरुद्ध त्यांचाच पॅटर्न वापरला

सनरायजर्स हैदराबादचा संघ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पंजाब किंग्जनं हैदराबादच्या होम ग्राऊंडवर दमदार फलंदाजी केली. पंजाबच्या डावाची सुरुवात प्रियांश आर्या आणि प्रभासिमरन सिंह या दोघांनी केली.प्रियांश आर्यानं चेन्नई विरुद्धचा फॉर्म आजच्या मॅचमध्ये कायम टेवला. प्रियांश आर्यानं 6 षटकार आणि 2  चौकार मारत 13 बॉलमध्ये 36  धावा केल्या. तर, प्रभासिमरन सिंह यानं 1 षटकार आणि 7 चौकार मारत 42  धावा केल्या.  पंजाबनं पहिल्या ओव्हरपासूनचं आक्रमक धोरण राबवलं होतं. त्यामुळं प्रियांश आर्या बाद झाला तेव्हा त्यांचा स्कोअर 4 ओव्हरमध्ये 66  धावा होता. 

श्रेयसची कॅप्टन पदाला साजेशी खेळी

श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा कॅप्टन झाल्यानंतर संघाची कामगिरी सुधारली आहे. पंजाबनं आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब किंग्जकडून कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यरनं सुरुवातीला प्रभासिमरन सिंह आणि नेहाल वढेरासोबत भागीदारी केली. श्रेयस अय्यरनं 6 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर 82  धावांची खेळी केली. दुसरीकडे नेहाल वढेरानं 22  धावा करुन कॅप्टनला साथ दिली. 

मार्कस स्टॉयनिसकडून मोहम्मद शमीची धुलाई 

आजच्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादचा सर्वाधिक महागडा गोलंदाज मोहम्मद शमी ठरला. मोहम्मद शमीनं 20 वी ओव्हर टाकली यामध्ये त्यानं 27 धावा दिल्या. मार्कस स्टॉयनिसनं 4 षटकार मारले, त्यानं 34  धावा केल्या. शमीनं 4 ओव्हरमध्ये 75  धावा दिल्या. तर, पंजाब किंग्जनं यंदाच्या हंगामातील सर्वाधिक स्कोअर केला आहे. पंजाबनं  20 ओव्हरमध्ये 6  बाद 245  धावा केल्या आहेत.  

हैदराबादचा संघ : अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कॅप्टन), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि ईशान मलिंगा

पंजाब किंग्ज : प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहाल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंह, मार्को जेनसन, अर्शदीप सिंह, लॉकी फर्ग्यूसन, युजवेंद्र चहल

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget