एक्स्प्लोर

IPL 2025 दरम्यान भारतीय खेळाडू इंग्लंडला होणार रवाना; शुभमन गिल सोडणार गुजरात टायटन्सची साथ? मोठी माहिती आली समोर

India Tour Of England 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होत आहे.

India Squad For England Test Series 2025 : अलिकडच्या काळात रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वी भारत-अ संघाचा इंग्लंड दौरा 30 मे पासून सुरू होणार होता, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणाव संपल्यानंतर, आज आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

आयपीएल 2025 पुन्हा एकदा 17 मे पासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होईल. ज्यामुळे थेट भारत-अ संघ आणि इंग्लंडच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की इंडिया-अ संघात यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन ही दोन मोठी नावे समाविष्ट केली जाऊ शकतात.

द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यात इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल या रूपात दोन मोठी नावे इंडिया-अ संघाकडून खेळू शकतात. त्याच अहवालात असेही सांगण्यात आले होते की, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती इंडिया-अ च्या पहिल्या सामन्यासाठी 14 सदस्यीय संघ निवडू शकते. या संघात अशा खेळाडूंना स्थान दिले जाऊ शकते जे आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाहीत.

2025 च्या आयपीएल दरम्यान हे खेळाडू इंग्लंडला जाणार....

यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांच्याशिवाय करुण नायर, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, खलील अहमद, आकाशदीप, मानव सुथार आणि अंशुल कंबोज यांना भारत-अ संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याच वेळी, आयपीएल 2025 मध्ये खेळत नसलेला सरफराज खान देखील या संघाचा भाग असू शकतो. दरम्यान, बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार इंग्लंड दौऱ्यासाठी तंदुरुस्त नसण्याची शक्यता आहे.

शुभमन गिल सोडणार गुजरात टायटन्सची साथ? 

त्याच वृत्तानुसार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे इंडिया-अ च्या दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतात. इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी टीम इंडियाविरुद्ध एक इंट्रा-स्क्वॉड सामना देखील खेळला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर भारत-अ सामन्यांमधील खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

हे ही वाचा :

Preity Zinta and Glenn Maxwell : 'मॅक्सवेलशी लग्न केले नाहीस, म्हणूनच...' चाहत्याने ओलांडली मर्यादा! रागाच्या भरात प्रिती झिंटाची भली मोठी पोस्ट; म्हणाली, लिंगभेद थांबवा...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Digvesh Rathi Catch : फिन एलन आऊट होता की षटकार होता? दिग्वेश राठीनं घेतलेल्या कॅचवरुन वादाचा भडका, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
फिन एलन आऊट होता की षटकार होता? दिग्वेश राठीनं घेतलेल्या कॅचवरुन वादाचा भडका, व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Nashik Crime News: महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
महिला पोलीस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् वासनेचा बाजार उघड केला; नाशिकमधील नामांकित कंपनीतील काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड कसा झाला?
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Embed widget