Gujarat Titans vs Punjab Kings IPL 2025 : आयपीएल 2025 चा पाचवा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. प्रियांश आर्यने पदार्पणाच्या सामन्यात 47 धावांची शानदार खेळी करत पंजाब किंग्जला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्रेयस अय्यर तुफानी खेळी खेळली, पण तीन धावांनी त्याचे शतक हूकले. तो 97 धावा करून नाबाद राहिला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 243 धावा केल्या आहेत.

पंजाब किंग्जला 243 धावांपर्यंत पोहोचवण्यात शशांक सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने श्रेयस अय्यरसोबत 81 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात श्रेयस अय्यर 97 धावांवर खेळत होता, पण मोहम्मद सिराजने टाकलेल्या शेवटच्या षटकात शशांकने 5 चौकार मारले. या षटकात एकूण 23 धावा केल्या. ज्यामुळे संघाने 243 धावा केल्या.  

पंजाब किंग्जच्या डावात 16 षटकार 

श्रेयस अय्यरने 42 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. पंजाब किंग्जच्या डावात एकूण 16 षटकार मारण्यात आले. अय्यरच्या 9 षटकारांव्यतिरिक्त, प्रियांश आर्य, मार्कस स्टोइनिस आणि शशांक सिंग यांनी प्रत्येकी 2 षटकार मारले. अजमतुल्लाहने एक षटकार मारला.

प्रियांश आर्य नावाचं वादळ

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने प्रभसिमरन सिंगच्या रूपात पहिली विकेट गमावली. ज्याला 5 धावा काढून कागिसो रबाडाने आऊट केले. यानंतर, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रियांश आर्यने 23 चेंडूत तुफानी 47 धावा केल्या. या डावात त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले, पण तो अर्धशतकापासून 3 धावांनी हूकला. त्याला रशीद खानने बाद केले.

साई किशोरने ग्लेन मॅक्सवेलसह घेतल्या 2 चेंडूत 2 विकेट्स

पंजाब किंग्जने 10 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला होता. नंतर, साई किशोरने टाकलेल्या 11 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अजमतुल्लाह उमरझाई (16 धावा) पुढच्याच चेंडूवर किशोरने ग्लेन मॅक्सवेलला एलबीडब्ल्यू आउट केले. आयपीएलमध्ये मॅक्सवेल खाते न उघडता बाद होण्याची ही 19 वी वेळ होती. त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला. तो बाद झाला नसला तरी, चेंडू स्टंपवरून जात होता आणि जर त्याने रिव्ह्यू घेतला असता तर तो वाचला असता.