Sarfaraz Khan IPL 2026 Auction : भारतीय फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने मंगळवारी झालेल्या आयपीएल 2026 मिनी-ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पाच वेळा विजेता ठरलेल्या सीएसकेने सरफराजला त्याच्या 75 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर संघात सामील करून घेतले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण आणि स्फोटक कामगिरीचं हे मोठं बक्षीस मानलं जात आहे. ऑक्शनच्या काही तास आधीच सरफराजने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एका सामन्यात अवघ्या 22 चेंडूत 73 धावांची खेळी खेळली होती. सुरुवातीच्या फेऱ्यात अनसोल्ड राहिल्यानंतर अखेर सीएसकेने त्याला आपली सहावी पसंती म्हणून संघात घेतलं.

Continues below advertisement

सरफराजची भावूक पोस्ट

सरफराजने शेवटचा आयपीएल सामना 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सनराइजर्स हैदराबादविरुद्ध खेळला होता. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत 6 डावांत 256 धावा, 64.00 ची सरासरी आणि 182.85 चा स्ट्राइक रेट राखत जबरदस्त प्रभाव पाडला आहे. सीएसकेकडून निवड झाल्यानंतर सरफराजने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं, “खूप-खूप धन्यवाद सीएसके, माझ्या करिअरला नवी जिंदगी दिल्याबद्दल.” त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा आनंद आणि भावना स्पष्टपणे दिसून येतात.

Continues below advertisement

अनकॅप्ड खेळाडूंचा धमाका

दरम्यान, अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांनीही इतिहास रचला आहे. सीएसकेने या दोघांना 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलं असून, ते आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. याशिवाय, सीएसकेने वेस्टइंडीजचा अष्टपैलू अकील होसिन यालाही 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर संघात सामील करून घेतलं आहे.

सीएसकेने या मिनी-ऑक्शनमध्ये सरफराज खान, मॅट हेन्री आणि राहुल चाहर यांनाही आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्याआधी, सर्वात चर्चेच्या ट्रेडमध्ये सीएसकेने विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांना संघात सामील केलं. मात्र, सीएसकेने रविंद्र जडेजा आणि सॅम करन या दिग्गज अष्टपैलूंना रिलीज केलं असून, हे दोघे आता राजस्थान रॉयल्स (RR) कडून खेळणार आहेत. तसेच, मथीशा पथिरानालाही रिलीज केल्यामुळे सीएसकेच्या पर्समध्ये 13 कोटी रुपयांची जागा मोकळी झाली आहे.

आयपीएल 2026 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी- (CSK IPL 2026 Auction)

प्रशांत वीर - 14.20 कोटी रुपयेकार्तिक शर्मा  - 14.20 कोटी रुपयेमॅथ्यू शॉर्ट - 1.5 कोटी रुपयेअमन खान - 40 लाख रुपयेझॅक फाउल्क्स - 75 लाख रुपयेसरफराज खान - 75 लाख रुपये राहुल चहर - 5.20 कोटी रुपये मॅट हेन्री -2  कोटी रुपयेअकील होसेन -2 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ - (IPL 2026 CSK Full Squad)

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅशनल चौधरी, प्रवीण चौधरी, प्रशांत वीर, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स.

हे ही वाचा -

फक्त 4 खेळाडूंची खरेदी, प्रीती झिंटाची तगडी टीम; पंजाब किंग्स 'या' Playing XI सोबत गाठणार IPL 2026ची फायनल