RCB vs PBKS IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या मैदानावर पराभवाची हॅटट्रिक... पंजाब किंग्जने केला पराभव

आयपीएल 2025 मध्ये आज रजत पाटीदारचा आरसीबी आणि श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्ज बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत आहे.

किरण महानवरLast Updated: 19 Apr 2025 12:20 AM

पार्श्वभूमी

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Updates : आयपीएल 2025 मध्ये आज रजत पाटीदारचा आरसीबी आणि श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्ज बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत आहे. दोन्ही संघ उत्तम...More

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या मैदानावर पराभवाची हॅटट्रिक... पंजाब किंग्जने केला पराभव

पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने आरसीबीचा 5 गडी राखून पराभव केला. पुन्हा एकदा आरसीबी घरच्या मैदानावर हरला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 95 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने 12.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. पंजाबकडून सुरुवातीला गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि नंतर फलंदाजीत नेहल वधेराने 19 चेंडूत नाबाद 33 धावांची महत्त्वाची खेळी केली. या विजयासह, पंजाब किंग्ज आता पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.