एक्स्प्लोर

MI vs RCB IPL 2025 : शानदार... जबरदस्त! पांड्याची कडक बॅटिंग, पण बंगळुरूने हिरावला मुंबईच्या तोंडचा घास, RCB चा थाटात विजय

आयपीएल 2025 मध्ये एका रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : आयपीएल 2025 मध्ये एका रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 221धावांचा डोंगर उभा होता. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने सामना 12 धावांनी सामना गमावला. एकेकाळी असे वाटत होते की, मुंबई इंडियन्सचा संघ हा सामना जिंकू शकेल. पण आरसीबीच्या गोलंदाजांनी शेवटच्या क्षणी मुंबईच्या तोंडचा घास हिरावला आणि संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत आरसीबीचा हा तिसरा विजय आहे.  

किंग कोहली अन् रजत पाटीदारचा तडाखा!

या सामन्यात आरसीबीची सुरुवात धक्कादायक झाली, कारण पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला फक्त चार धावावर आऊट केले. यानंतर, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये 52 चेंडूत 91 धावांची मोठी भागीदारी झाली. विघ्नेश पुथूरने पडिक्कलला आऊट करून ही भागीदारी मोडली. त्याने दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. यानंतर किंग कोहलीला रजत पाटीदारची साथ मिळाली आणि दोघांनी 48 धावांची भागीदारी केली.

15 व्या षटकात हार्दिक पांड्याने किंग कोहलीला आऊट केले. त्याने आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. उजव्या हाताच्या फलंदाजाने 29 चेंडूत हंगामातील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 57 वे अर्धशतक आहे. त्याच वेळी, कर्णधार पाटीदारची बॅटही जोरात गर्जना करत होती. त्याने पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनला खातेही उघडता आले नाही. जितेश शर्मा 40 धावांवर आणि टिम डेव्हिड एका धावावर नाबाद राहिला. ज्यामुळे मुंबई इंडियन्सला 20 षटकांत पाच गडी गमावून 221 धावा करता आल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर विघ्नेश पुथूरला एक यश मिळाले.

रोहित शर्मा-सूर्यकुमार यादव फेल 

222 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माने निश्चितच काही चांगले शॉट्स खेळले, पण तो दुसऱ्याच षटकात 17 धावा काढून बाद झाला. यानंतर, चौथ्या षटकात रॅकल्टनही बाद झाला. त्याच्या बॅटमधून फक्त 17 धावा आल्या. यानंतर सूर्यकुमार यादवने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तोही 12 व्या षटकात बाद झाला. सूर्याच्या बॅटमधून 28 धावा आल्या.

कुंग-फू पांड्या अन् तिलकची कडक बॅटिंग

यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माचे वादळ आले. दोघांनीही तुफानी फलंदाजी केली. हार्दिकने 15 चेंडूत 42 धावा केल्या, तर तिलकने 29 चेंडूत 56 धावा केल्या. एकेकाळी असे वाटत होते की, मुंबई हा सामना सहज जिंकेल. पण भुवीने सामना फिरवला. अखेर मुंबई संघाला फक्त 209 धावा करता आल्या आणि 12 धावांनी सामना गमावला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश

व्हिडीओ

Pune BJP Congress Protest Update : काँग्रेस-भाजप राड्यादरम्यान दगडफेक, महिला पोलीस जखमी
Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'
Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Divyaa Agarwal Husband Apurva Padgaonkar: प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार अडचणीत? बिझनेसमन नवऱ्यानं नात्यावर सोडलं मौन, चाहतेही झालेत चकीत
प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार अडचणीत? बिझनेसमन नवऱ्यानं नात्यावर सोडलं मौन, चाहतेही झालेत चकीत
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
Embed widget