Royal Challengers Bangaluru Angry Fans : आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात आरसीबीनं फक्त चाहत्यांची मनं जिंकली आहेत, त्यांना चषक जिंकता आला नाही. आता 17 व्या हंगामात आरसीबी चषकावर नाव कोरेल, अशी चाहत्यांना आशा आहे. पण आयपीएल 2024 ची आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. तीन सामन्यापैकी आरसीबीने दोन सामने गमावले आहेत. शुक्रवारी आरसीबीला कोलकात्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर चाहत्यांचा राग अनावर गेला. काहींनी विराट कोहलीला ट्रोल केले, त्याशिवाय विराट कोहली जोपर्यंत आरसीबीमध्ये आहे, तोपर्यंत चषक जिंकता येणार नाही, असेही म्हटलेय.


विराट कोहलीने कोलकात्याविरोधात एकाकी झुंज दिली. विराट कोहलीने 59 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतरही त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. चाहत्यांनी विराट कोहलीची खेळी संथ असल्याचे म्हटलेय. विराट कोहलीमुळे आरसीबीला 200 पार पोहचला आले नाही, असे काही चाहत्यांना वाटतेय. आता सोशल मीडियावर चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला. एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये तो म्हणतोय की संघात जोपर्यंत विराट कोहली आहे, तोपर्यंत आरसीबी चषकावर नाव कोरु शकत नाही. 


व्हिडीओत नेमकं काय ?


सोशल मीडियावर एक छोटा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये रिपोर्ट आरसीबीच्या एका चाहत्याबरोबर बोलत आहे. त्यावेळी कॅमेरा दुसऱ्या एका चाहत्याकडे जातो. त्यामध्ये तो चाहता म्हणतोय की, संघात जोपर्यंत विराट कोहली आहे, तोपर्यंत आरसीबी चषक जिंकू शकत नाही. दरम्यान,  2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. तेव्हापासून आरसीबीने तीन वेळा फायनलमध्ये धडक मारली, पण चषक जिंकता आला नाही. त्यामुळे आरसीबीचे चाहते नाराज आहेत, त्याशिवाय त्यांनाही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 






आयपीएल 2024 मध्ये विराटची दोन अर्धशतके - 


आयपीएलच्या 17 व्या हंगामात विराट कोहली लयीत दिसतोय. विराट कोहलीने पहिल्या सामन्यात 21 धावांची खेळी केली होती. त्यानंतर लागोपाठ दोन अर्धशतकं ठोकली आहे. विराट कोहलीने पंजाबविरोधात 77 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याविरोधात विराट कोहलीने नाबाद 83 धावांची शानदार खेळी केली. विराट कोहलीकडे यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅपही आहे. 


आरसीबीची खराब सुरुवात - 


आयपीएल 2024 मध्ये आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. आरसीबीला पहिल्या तीन सामन्यात दोन सामने गमावावे लागले. पहिल्याच सामन्यात चेन्नईने सहा विकेटने आरसीबीला हारवलं होतं. त्यानंतर शुक्रवारी कोलकात्याने आरसीबीचा सात विकेटने पराभव केला. आरसीबीने पंजाबविरोधात चार विकेटने विजय मिळवला.