(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिटमॅन रोहित शर्मा जियो सिनेमाचा ब्रँड अँबेसडर, डिजिटल स्ट्रीमिंग वेगाने होणार
Rohit Sharma IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Rohit Sharma IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरही चाहते सामना पाहत आहे. जिओ सिनेमावर आयपीएलचे मोफत प्रेक्षपण पाहायला मिळते. आता याची आनंद अधिक द्विगुणित होणार आहे. कारण, हिटमॅन रोहित शऱ्मा जिओ सिनेमाचा ब्रँड अँबेसडर झालाय. रोहित शर्माची लोकप्रियता या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला अधिक गती देईल, असे म्हटले जातेय.
हिटमॅन रोहित शर्मा सध्याच्या घडीचा आघाडीच्या खेळाडूपैकी एक आहे. टीम इंडियाचे नेतृत्वही रोहित करत आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई संघाचा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आथा रोहित शर्मा जिओ सिनेमासोबत नवीन इनिंग सुरु करत आहे. जिओ सिनेमाने रोहित शर्माला ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्त केलेय.
JioCinema सोबत जोडल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, Jio Cinema हे मोबाईल फोन आणि कनेक्टेड टीव्हीवर भारतातील खेळ पाहण्याचा मार्ग बदलण्याचे माध्यम बनत आहे. जिओ सिनेमाशी जोडल्याबद्दल रोहित शर्माने आभार व्यक्त केले आहेत. हे डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिकेट चाहत्यांना हवी असलेली लवचिकता प्रदान करत आहे. आता चाहते अधिक गोपनीयतेसह गेमचा आनंद घेऊ शकतात, असे रोहित म्हणाला.
#IPLonJioCinema sab dekh sakte hai, chaahe jo bhi sim card use karein!
— JioCinema (@JioCinema) April 21, 2023
Join @ImRo45 and catch the #TATAIPL action, streaming FREE on #JioCinema for all telecom operators! pic.twitter.com/xzGidPpf7V
रोहितुळे प्रेक्षकांची संख्या आणखी वाढणार -
वायकॉम 18 स्पोर्ट्सचे सीईओ अनिल जयराज यांनी रोहित शर्माचे स्वागत केले. रोहित शर्मामुळे प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. रोहित जियो सिनेमाच्यी टीमसोबत काम करेल. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी टीम म्हणून काम करतील. रोहित शर्मा हे खिलाडूवृत्तीचे आणि अतुलनीय नेतृत्वाचे प्रतीक आहे. तो चाहत्यांना आणि खेळाडूंना प्रिय असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे अनिल जयराज म्हणाले.