एक्स्प्लोर

Riyan Parag : रियान परागकडून सलग 6 षटकारांची आतषबाजी! पण संघाच्या पराभवानंतर संतापला, कोणावर रागावला?

इंडियन प्रीमियर लीगच्या एका रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने विक्रमी कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) एका रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने विक्रमी कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. त्याने सलग 6 षटकार मारून मैदानात धुमाकूळ घातला.ही खेळी पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला, तर सोशल मीडियावर त्याचे कौतुक करण्याची लाट उसळली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रियान परागने एक अद्भुत खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले, परंतु एका मोक्याच्या क्षणी तो आऊट झाला आणि सामना राजस्थान रॉयल्सच्या हातातून निसटला.

शुभम दुबेने शेवटच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारून कोलकाता नाईट रायडर्सच्या हृदयाचे ठोके निश्चितच वाढवले, परंतु राजस्थान रॉयल्सला एका चुरशीच्या सामन्यात 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कर्णधार रियान पराग खूप रागात दिसला. हा राग संघातील इतर खेळाडूंसाठी नव्हता तर स्वतःसाठी होता.

रियान परागने पराभवासाठी स्वतःला जबाबदार धरले 

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवानंतर मुलाखतीसाठी आला, तेव्हा रियान पराग नाराज दिसत होता. त्यामुळे तो असेही म्हटले की त्याला इंटरव्यू देण्याची इच्छा नाही. सामना गमावल्यानंतर रियान पराग म्हणाला, "मी शेवटच्या दोन षटकांपर्यंत थांबण्याचा विचार करत होतो, पण दुर्दैवाने मी 18 व्या षटकात आऊट झालो. हा माझा चुकीचा अंदाज होता. मला शेवटपर्यंत खेळायचे होते."

गोलंदाजीबद्दल बोलताना रियान पराग म्हणाला की, मला वाटते की शेवटच्या 6 षटकांमध्ये आम्हाला चांगले पर्याय सापडले असते. कदाचित इतर गोलंदाजीचे पर्यायही असतील. आपण स्वतःकडेच तक्रार करावी, दुसऱ्याकडे नाही. हरल्यानंतर इंटरव्यू देणे चांगले वाटत नाही. आम्ही मैदानावर चांगली कामगिरी करू शकलो नाही आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत.

रियान परागने रचला इतिहास 

ईडन गार्डन्सवर खेळलेला सामना केकेआरने जिंकला असला तरी राजस्थान रॉयल्सच्या विजयापेक्षा त्यांच्या पराभवाचीच चर्चा जास्त होत आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात कोणीही केले नव्हते असा पराक्रम रियान परागने केला आहे. तो आयपीएलमध्ये सलग 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला आहे.

मोईन अलीच्या षटकात रियान परागने सलग 5 षटकार मारले आणि त्यानंतर पुढच्याच षटकात तो स्ट्राईकवर येताच वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर षटकार मारला. त्याने 45 चेंडूत 95 धावांची अद्भुत खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. राजस्थान रॉयल्सने या हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 9 सामने गमावले.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Embed widget