RCB vs PBKS IPL 2025 Final : आज आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. सोशल मीडियावरील 'ई साला कप नामदे' ट्रेंडमधून आरसीबी चाहत्यांमधील रोमांच स्पष्टपणे दिसून येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या वातावरणात कॅनेडियन रॅपर ड्रेक देखील टीम आरसीबीला पाठिंबा देताना दिसला आहे, ज्याने त्यांच्या विजयावर लाखो डॉलर्सची मोठी पैज लावली आहे.

जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे क्रिकेट! ड्रेकने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघावर मोठी पैज लावली आहे. जर RCB ने ही मोसम जिंकला, तर ड्रेकला लाखो डॉलर म्हणजेच कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे. प्रसिद्ध कॅनेडियन रॅपरने कोहलीच्या आरसीबीवर 6.5 कोटींचा पैज लावला, याविषयी खुद्द त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे. 

आयपीएल 2025 चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रजत पाटीदारच्या आरसीबी आणि श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. या वर्षी जगभरातील आयपीएलवर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सट्टा लावण्यात आला आहे. चाहते केवळ सामन्याच्या निकालावरच नव्हे, तर टॉप स्कोअरर आणि प्रत्येक चेंडूवरही जोरदार सट्टा लावत आहेत. लाखो डॉलर्सच्या या सट्टेबाजीत लहान ते मोठे सट्टा लावले जात आहेत. काही लोक $5 पासून सुरुवात करत आहेत, तर काही हजारो डॉलर्सपर्यंत सट्टा लावत आहेत. या हाय-प्रोफाइल सट्टेबाजीत कॅनेडियन रॅपर ड्रेक सारखी नावे देखील समाविष्ट आहेत.

रॅपर ड्रेकने आरसीबीच्या विजयावर $7.5 दशलक्षचा लावला सट्टा

मंगळवारी, रॅपर ड्रेकने इंस्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला. ज्यामध्ये त्याने आरसीबीच्या आयपीएल 2025 च्या विजयावर US $750,000 (सुमारे 6.41 कोटी रुपये) चा मोठा सट्टा लावला आहे. पावतीनुसार, जर विराट कोहलीच्या संघाने पंजाब किंग्जचा पराभव केला तर ड्रेकला $1.312 दशलक्ष (सुमारे 11.2 कोटी रुपये) मिळतील.

हे ही वाचा - 

Ahmedabad Weather IPL Final 2025 : अहमदाबादमध्ये हवामानाबाबत मोठी अपडेट, फायनल रद्द झाली तर कोण जिंकणार? जाणून घ्या पावसाची शक्यता किती?