RCB vs PBK IPL Final 2025 Chris Gayle : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याला आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली असून, रजत पाटीदारच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात हा थरारक सामना रंगला आहे. तब्बल 1 लाख 32 हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित असून, काही RCB तर काही पंजाबला पाठिंबा देत आहेत.

या ऐतिहासिक सामन्यात एक विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल. जो मैदानात पोहोचला एकदम हटके अंदाजात होता, त्याने एकाचवेळी RCB आणि पंजाब किंग्स दोन्हींच्या जर्सी परिधान केल्या होत्या. डोक्यावर 'पंजाबी' पगडी घातली होती तर अंगात जर्सी मात्र आरसीबीची होती. गेलच्या या अनोख्या अंदाजामुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.

गेलने आयपीएलमध्ये या दोन्ही संघांसाठी अनेक वर्षे खेळलं आहे आणि दोन्ही संघांसोबत त्याचे खास संबंध आहेत. विशेष म्हणजे, आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोघांनाही आजवर IPL ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजचा सामना या दोघांकरिता ऐतिहासिक ठरणार आहे. कोणताही संघ जिंकल्यास त्यांचा पहिलावहिला IPL किताब असणार आहे.

पंजाब किंग्जने घेतला गोलंदाजीचा निर्णय  

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यासाठी बंगळुरू आणि पंजाब संघाची प्लेइंग-11

बंगळुरू संघाची प्लेइंग-11 : फिल साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड

पंजाब संघाची प्लेइंग-11 : प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अझमतुल्ला उमरझाई, काइल जेमीसन, विजयकुमार विशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.