RCB vs KKR IPL 2025 : पावसामुळे कोलकाता-बंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबल टॉपवर
Bengaluru Weather LIVE Updates : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर स्थगित झालेली आयपीएल आजपासून पुन्हा सुरू होत आहे.

Background
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Live Updates : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर स्थगित झालेली आयपीएल आजपासून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक लांबले असून 25 मे रोजी होणारा अंतिम सामना आता 3 जूनला होईल. सध्या स्पर्धा अत्यंत रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. प्रत्येक सामना निर्णायक ठरत असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्व संघ आपापल्या ताकदीने झुंज देताना दिसत आहेत.
आज आयपीएल 2025 चा 58 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आगे. आजचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूमध्ये पाऊस पडत आहे.
आरसीबी-केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये कोणत्या क्रमांकावर?
जर आपण आयपीएल पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, या हंगामात आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे आणि केकेआर सहाव्या स्थानावर आहे. कोलकाता संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत. तर केकेआरचा एक सामना अनिर्णित राहिला. संघाने आतापर्यंत 11 गुण मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरला आजचा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 8 सामने जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. जर बंगळुरू आजचा सामना जिंकला तर ते 18 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असेल आणि 17 वा सामना रद्द झाला. तरीही आरसीबीला कोणतेही नुकसान सहन करावे लागणार नाही. संघ 17 गुणांसहही गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि बंगळुरू हे संघ 35 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी केकेआरने 20 वेळा विजय मिळवला आहे, तर आरसीबीने 15 वेळा कोलकात्याला हरवले आहे. कोलकाताच्या 20 विजयांपैकी 12 विजय चिन्नास्वामी मैदानावर झाले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात कोलकाताने बंगळुरूवर वर्चस्व गाजवले आहे, परंतु या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीत आरसीबी केकेआरपेक्षा पुढे आहे.
पावसामुळे कोलकाता-बंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबल टॉपवर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील आयपीएलचा 58वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्याचा नाणेफेकही होऊ शकला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघ 17 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. दरम्यान, केकेआर 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पण, त्यांचा प्रवास संपला आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले.
आयपीएलने भारतीय सैन्याला दिली सलामी; बंगळुरूमध्ये पाऊस सुरूच
बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. पण दरम्यान, ऑपरेशन सिंदूरसाठी आयपीएलने भारतीय सैन्याला सलामी दिली.




















