एक्स्प्लोर

RCB Captain Rajat Patidar : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून एन्ट्री, आरसीबीसाठी लग्नही पुढे ढकलले; आता किंग कोहलीचे स्वप्न पूर्ण केले, कर्णधार रजत पाटीदारची रंजक कहाणी

2022 साली एक फोन आला आणि आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलला.... तो होता रजत पाटीदार!

RCB Captain Rajat Patidar Story : 2022 साली एक फोन आला आणि आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलला.... तो होता रजत पाटीदार! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एक रिप्लेसमेंट म्हणून आलेला खेळाडू. कोणाला वाटलं होतं, की हा शांत स्वभावाचा फलंदाज एक दिवस विराट कोहलीचं 18 वर्षांचं स्वप्न पूर्ण करेल? 18 वर्षे आणि 18 आयपीएल हंगाम... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) प्रतीक्षा अखेर संपली. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील पहिली ट्रॉफी जिंकली. 

आता किंग कोहलीचे स्वप्न पूर्ण केले...

आणि स्पर्धेच्या अठराव्या हंगामात 18 नंबरची जर्सी घालणारा महान खेळाडू विराट कोहलीला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. सुरुवातीपासून एकाच संघाकडून खेळणाऱ्या या महान फलंदाजाचे स्वप्न पूर्ण झाले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुमारे 90 हजार प्रेक्षकांसमोर त्याने ट्रॉफी उचलली.

आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होत आहे, परंतु कर्णधार रजत पाटीदारचे योगदान यात कमी नाही. त्याने अखेर इतक्या वर्षांपासून ट्रॉफीसाठी आसुसलेल्या संघाला चॅम्पियन बनवले. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो महत्त्वाच्या क्षणी शांत राहिला आणि गोलंदाजीत चांगला बदल करत विरोधी संघावर दबाव आणला. जेव्हा आरसीबीने 190 धावा केल्या तेव्हा बहुतेक क्रिकेट पंडितांचे मत होते की पंजाब संघाकडे 191 धावांचे लक्ष्य सहज गाठण्यासाठी मजबूत फलंदाजी आहे. पण, असे घडले नाही आणि रजत पाटीदारच्या हुशार कर्णधारपदामुळे आरसीबीला 6 धावांनी सामना जिंकण्यास मदत झाली.

रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून एन्ट्री....

2022 च्या IPL हंगामात RCB चा खेळाडू लवनीथ सिसोदिया जखमी झाला, आणि त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात घेतलं गेलं. सुरुवातीला पाटीदारला वाटलं की त्याला खेळायला संधी मिळणार नाही, पण नशिबाने त्याला संधी मिळाली. 25 मे 2022 रोजी, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या Eliminator सामन्यात पाटीदारने 112 धावांची नाबाद खेळी केली. ही IPL प्लेऑफमध्ये कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूने केलेली पहिली शतकी खेळी होती. या कामगिरीमुळे तो चर्चेत आला आणि RCB ने त्याला पुढील हंगामासाठी कायम ठेवला.

आरसीबीसाठी पुढे ढकलले लग्न...

रजत पाटीदारचे वडील मनोहर पाटीदार यांनी 2022 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, "त्याचे लग्न 9 मे रोजी होणार होते. हा एक छोटासा कार्यक्रम होता. मी इंदूरमधील एका हॉटेलमध्ये कमी पाहुण्यांसाठी बुकिंग केलं होतं. लग्न मोठ्या थाटामाटात नव्हतं करायचं, म्हणून आम्ही आमंत्रण पत्रिकाही छापल्या नव्हत्या.मात्र अचानक पाटीदारला RCB संघातून खेळायची संधी मिळाली. या फोन कॉलमुळे संपूर्ण नियोजन बदललं."

2025 च्या आयपीएल हंगामात रजत पाटीदारने आरसीबीचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली RCB ने पहिल्यांदाच IPL ट्रॉफी जिंकली, आणि 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली. त्याच्या संयमित नेतृत्वशैलीमुळे संघाला हे यश मिळालं.

हे ही वाचा - 

CSK IPL 2025 Fair Play Award : चॅम्पियन आरसीबी ठरली, पण चर्चा सीएसकेची झाली; फायनलमध्ये न पोहचताही चेन्नईने ट्रॉफी जिंकली, IPL कडून मोठा सन्मान

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Embed widget