Ravichandran Ashwin : इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 2025 च्या हंगामातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या रवीचंद्रन अश्विनने टी 20 फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना येणाऱ्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या फलंदाजांना खूप फायदा होत असल्याचं अश्विन म्हणालाय. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या सामन्यांमध्ये 200 पेक्षा कमी धावसंख्या झालेले सामने फार कमी पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सामन्यात ओव्हर टाकत असताना कमी धावा दिल्या जाव्यात, या विचारात गोलंदाज असतात. त्यामुळे त्यांना मानसिक आरोग्याच्या मदतीची आवश्यकता असू शकते.
गोलंदाजीपेक्षा फुल टॉस टाकणे ही एक चांगली पद्धत; अश्विनचा उपहासात्मक टोला
अश्विनने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयपीएलमधील काही खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना यश मिळवणे फार कठीण होत आहे. सध्या आयपीएलमध्ये पारंपारिक गोलंदाजीपेक्षा फुल टॉस टाकणे ही एक चांगली पद्धत असू शकते, असंही अश्विन गमतीने म्हणाला.
आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात झालेले सामन्यात अनेक संघांनी धावांचा डोंगर उभा केलाय. जवळपास अनेक सामन्यात 200 धावांचा टप्पा पार करण्यात अनेक संघ यशस्वी ठरले आहेत. कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्येही एका संघाने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. इतर अनेक सामन्यांमध्ये संघांनी 200 पेक्षा जास्त धावा केल्या. 2024 च्या आयपीएल हंगामात 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम लागू झाल्यानंतर, संघांना एक फलंदाज किंवा गोलंदाज बदलण्याची परवानगी होती. त्यानंतर सामन्याची सरासरी 189 धावांची झाली. अश्विन म्हणाला की, गोलंदाजांना लवकरच वैयक्तिक मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासेल. काही खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे अशक्य झाले आहे.
चेन्नईने 9.75 कोटी खर्च करत अश्विनला पुन्हा एकदा संघात सामील केलं
अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 9.75 कोटी रुपये खर्च करत परत एकदा आपल्या संघात सामील केले आहे. 2015 नंतर फ्रँचायझीमध्ये त्याचे हे सीएसके मध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विनने चार षटकात 31 धावा देत एक विकेट घेतली होती. रविचंद्रन अश्विनचा पुढील IPL 2025 सामना 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
