IPL 2025 Mega Auction : सौदी अरेबियामध्ये दोन दिवस चाललेल्या आयपीएल 2025 मेगा लिलाव संपला आहे. या लिलावासाठी 577 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी 182 खेळाडू विकले गेले तर उर्वरित खेळाडूंना कोणात्या संघानी भाव दिला नाही. न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत काही आश्चर्यकारक नावे होती ज्यांची चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.


या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा माजी सलामीवीर पृथ्वी शॉचेही नाव आहे. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती, परंतु कोणत्याही फ्रेंचायजीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. शॉ न विकला गेल्यावर, दिल्ली कॅपिटल्सचे माजी सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांचे असे विधान समोर आले आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.


मोहम्मद कैफ पृथ्वी शॉवर संतापला


जिओ सिनेमावर आयपीएल लिलावाबद्दल बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला की, पृथ्वी शॉ एक भारी खेळाडू आहे, परंतु त्याने चांगली कामगिरी केली नाही आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. आयपीएलमध्ये त्याची सरासरी 23.94 आहे आणि स्ट्राइक रेट 147 पेक्षा जास्त आहे.




पृथ्वीला दिल्लीने खूप संधी दिल्या पण....


माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणाला की, "पृथ्वी शॉला दिल्लीने खूप संधी दिल्या कारण त्याच्याकडून अपेक्षा होती. तो पॉवरप्लेचा खेळाडू आहे. या खेळाडूमध्ये एका षटकात 6 चौकार मारण्याची ताकद आहे. त्याने शिवम मावीला मारले देखील आहेत. आम्ही सामना जिंकू या आशेने अनेक वेळा पृथ्वी शॉला वगळावे की खेळावे यावर चर्चा झाली होती. त्याला अकरामध्ये ठेवायचे की नाही हे रात्री ठरवले होते, पण सकाळी तो संघात होता.


कैफ पुढे म्हणाला, "रात्री आम्ही म्हणायचो की आम्हाला हा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये नको आहे, तो धावा काढत नाही, तो फ्लॉप आहे. पण नाणेफेक करण्यापूर्वी आम्ही म्हणायचो की आम्हाला हा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये हवा आहे. त्याला खूप संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा उठवता आला नाही. इतक्या संधी दिल्या पण त्याला फायदा घेतला आला नाही, त्यामुळे त्याने आता आपल्या खेळाबद्दल विचार करावा लागेल, ही त्याच्यासाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. 


2018 पासून दिल्ली कॅपिटल्ससोबत होता पृथ्वी शॉ 


पृथ्वी शॉ 2018 पासून दिल्ली कॅपिटल्ससोबत होता, तेव्हा फ्रँचायझीने त्याला 1.2 कोटी रुपयांना विकत घेतले. मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने राखून ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचे नाव नव्हते. आता पृथ्वीला त्याच्या फॉर्म आणि खराब फिटनेसवर सर्व लक्ष केंद्रित करावे लागेल. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. रायन पराग, शुभमन गिल, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा यांसारखे खेळाडू, जे त्या संघाचा भाग होते, त्यांना एकतर त्यांच्या फ्रेंचायझीने कायम ठेवले किंवा लिलावात मोठी रक्कम मिळाली, परंतु पृथ्वी ग्लॅमरमध्ये हरवून गेली.