IPL Dhoni on CSK Captaincy : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघानं अखेर पहिला विजय नोंदवत खातं उघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 12 धावांनी पराभव केला. चेन्नईने चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर उतरून शानदार मिळवला. मराठमोळा ऋतूराज गायकवाड आणि मोईन अली हे विजयाचे शिल्पकार ठरले. ऋतुराजने 57 धावांची दमदार खेळी केली, तर मोईन अलीने 19 धावा केल्या. लखनौ विरोधातील सामना जिंकल्यानंतरही धोनी संघातील गोलंदाजावर निराश आहे. सामन्यानंतर धोनी चेन्नईच्या गोलंदाजांना झापलं आणि वॉर्निंग दिली.


13 वाइड आणि 3 नो बॉल


चेन्नईने लखनौवर विजय मिळवला असला तरी, लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी 13 वाइड आणि 3 नो बॉल टाकले. गोलंदाजांच्या या कामगिरीवर कर्णधार धोनी नाराज आहे. चेन्नई सुपरजायंट्सने दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत आपले खातं उघडलं आहे. मात्र या विजयानंतरही कर्णधार एमएस धोनी नाखूश दिसला. धोनी गोलंदाजांनी झापलं आणि कर्णधारपद सोडण्याचा इशाराही दिला आहे.


पाहा व्हिडीओ :






धोनीनं गोलंदाजांना झापलं


या सामन्यात पहिल्यांदा फलंदाडी करताना चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमावून 217 धावा केल्या. फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यानंतर, गोलंदाजीत वेगवान समाधानकारक दिसली नाही. दीपक चहरला वेगवान गोलंदाजी करता आली नाही. तर, तुषार देशपांडेने एका ओव्हरमध्ये लागोपाठ वाइड आणि नो बॉलसह 18 धावा देत सुरुवात केली. बेन स्टोक्स आणि हंगर गेम्सच्या बाबतीतही असंच झालं. त्यामुळे कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानावर चिंतेत दिसत होता. त्यानंतर मोईन अलीने गोलंदाजीची धुरा सांभाळत सीएसकेला एकापाठोपाठ एक यश मिळवून दिलं. त्याला मिचेल सँटनरनेही चांगली साथ दिली. त्यामुळे लखनौचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 205 धावा करू शकला आणि सामना 12 धावांनी गमावला.


धोनीकडून कर्णधारपद सोडण्याचा इशारा


चेन्नईच्या गोलंदाजांनी लखनौ संघाविरुद्ध खेळताना 13 वाइड आणि 3 नो बॉल टाकले. त्यामुळे या सामन्यात संघाच्या विजयानंतरही चेन्नईच्या संघाची ही झुकती बाजू धोनीच्या नजरेतून लपून राहू शकली नाही. यामुळेच त्याने सामन्यानंतर गोलंदाजांना आपल्या शैलीत इशारा दिला. धोनी म्हणाला, "गोलंदाजांना वाईड आणि नो बॉल कमी करावे लागतील. त्यांच्यासाठी हा माझा दुसरा इशारा आहे. अन्यथा, नंतर तुम्हाला दुसऱ्या कर्णधाराच्या हाताखाली खेळायला तयार राहावं लागेल."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 Points Table : चेन्नईच्या विजयाचा बंगळुरूला फायदा, लखनौ कोणत्या स्थानावर, गुणतालिकेत मोठा बदल