MI vs SRH Score IPL 2025 : विल जॅक्सचा धमाका! मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सने केला पराभव
आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स आणि पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एमआयच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला आहे.

पार्श्वभूमी
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स आणि पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एमआयच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला...More
आयपीएल 2025 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने 20 षटकांत 5 बाद 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात, एमआयने 16 व्या षटकात 6 विकेट गमावून सामना जिंकला. एमआयकडून रायन रिकेल्टनने 31, रोहित शर्माने 26, विल जॅक्सने 36, सूर्यकुमार यादवने 26 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने 21 धावा केल्या. तिलक वर्मा 17 धावांवर नाबाद परतला. हैदराबादकडून पॅट कमिन्सने 4 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांतील तिसरा विजय आहे. हैदराबादचा हा पाचवा पराभव आहे.