MI vs CSK IPL 2025 : रोहित-सूर्या दादाचं वादळ! मुंबईचा मोठा विजय, CSKचा पराभव
MI vs CSK Live Updates IPL 2025 : आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे.
किरण महानवरLast Updated: 20 Apr 2025 10:55 PM

पार्श्वभूमी
Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Updates : आयपीएलचा अठरावा हंगाम प्रत्येक सामन्यासोबत अधिक रोमांचक होत आहे. आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला...More
Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Updates : आयपीएलचा अठरावा हंगाम प्रत्येक सामन्यासोबत अधिक रोमांचक होत आहे. आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ स्पर्धेत संघर्ष करत आहेत. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी तीन जिंकून आणि चार गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ सातव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 6 गुण आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत हैदराबाद, दिल्ली आणि केकेआरला पराभूत करण्यात यश मिळवले आहे. तर, यापूर्वी खेळलेल्या सामन्यांमध्ये त्यांना आरसीबी, लखनौ, गुजरात आणि चेन्नईविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. त्याच्या खात्यात 4 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आतापर्यंत फक्त लखनऊ आणि मुंबईविरुद्ध विजय मिळवता आला आहे. तर, कोलकाता, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि आरसीबी विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला.
MI vs CSK IPL 2025 : रोहित-सूर्या दादाचं वादळ! मुंबईचा मोठा विजय, CSKचा पराभव
सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्यातील शानदार भागीदारीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला नऊ विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 बाद 176 धावा केल्या, परंतु रोहित आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि 15.4 षटकांत 1 बाद 177 धावा करून मुंबईला सामना जिंकण्यास मदत केली. रोहितने 45 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 76 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 68 धावा केल्या.