Gujarat Titans VS Mumbai Indians Eliminator IPL 2025 : आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससाठी करो या मरो अशी लढाई आहे. आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघ मुल्लानपूरमध्ये भिडणार आहेत. विजेता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जाईल, तर पराभूत संघ आयपीएलमधून बाहेर पडेल. तसे, या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्स मोठ्या संकटात आहे. खरं तर, एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या 5 खेळाडूंनी टीमची साथ सोडली आहे.
मुंबईचे पाच खेळाडू खेळणार नाहीत एलिमिनेटर सामना
मुंबई इंडियन्सच्या विजयात मोठे योगदान देणारे पाच खेळाडू एलिमिनेटर सामन्यात दिसणार नाहीत. रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे सर्व मुंबई इंडियन्स सोडून त्यांच्या देशात गेले आहेत. विल जॅक्स वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, तर रिक्ल्टन आणि बॉश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची तयारी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला परतले आहेत.
चहर आणि तिलक पण बाहेर?
मुंबईसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे दोन स्टार भारतीय खेळाडू देखील एलिमिनेटर सामन्यातून बाहेर पडू शकतात. ते म्हणजे तिलक वर्मा आणि दीपक चाहर. जे दुखापतींशी झुंजत आहेत. दोन्ही खेळाडू चंदीगड विमानतळावर लंगडत चालताना दिसले.
मुंबईच्या संघात कोण खेळणार?
जर मुंबई इंडियन्सच्या संघातून पाच मोठे खेळाडू बाहेर गेले असतील तर प्रश्न असा आहे की प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश केला जाईल. जॉनी बेअरस्टो एलिमिनेटर सामन्यात खेळण्याची पक्की बातमी आहे. याशिवाय, विल जॅक्सच्या जागी चरित अस्लंकालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. मुंबईचा गुजरातविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब असल्याने या सामन्यातही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुंबईने गुजरातविरुद्ध फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर पाच सामने गमावले आहेत. गेल्या चार सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईने फक्त गुजरातविरुद्धच पराभव पत्करला आहे.
मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2025 साठी संपूर्ण संघ -
हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर
नवीन समावेश
जॉनी बेअरस्टो, चरिथ असलंका, रिचर्ड ग्लीसन
या नवीन खेळाडूंच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये नव्या जोमाने खेळण्याची संधी मिळाली आहे.
