MS Dhoni Likely to Captain CSK Again : आयपीएल 2025 मध्ये पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. सीएसकेने हंगामाची सुरुवात विजयाने केली होती पण त्यानंतर सलग दोन सामने हरले आहेत. मागील सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता संघाचा पुढचा सामना 5 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. चेपॉक येथे होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदात बदल होऊ शकतो आणि चाहते पुन्हा एकदा दिग्गज एमएस धोनीला सीएसकेचे नेतृत्व करताना पाहू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या सामन्यात फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडला झालेली दुखापत. जर तो तंदुरुस्त नसेल तर धोनी संघाची धुरा सांभाळू शकतो.

ऋतुराज गायकवाड बाहेर; MS धोनी होणार कर्णधार?

खरंतर, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड पुल शॉट चुकला आणि चेंडू थेट त्याच्या कोपरावर लागला. यानंतर, ऋतुराजने वैद्यकीय उपचारही घेतले आणि नंतर फलंदाजी सुरू ठेवली. त्याने सामन्यात 44 चेंडूत 63 धावांची खेळी खेळली. पण, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऋतुराजने सराव सत्रात भाग न घेतल्याने शंका निर्माण झाली होती. आता सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनीही माहिती दिली आहे की सीएसकेचा नियमित कर्णधार पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि जर तो बाहेर पडला तर एक तरुण यष्टिरक्षक (अनकॅप्ड खेळाडू एमएस धोनी) जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो.

सीएसके विरुद्ध डीसी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत हसी म्हणाला, "ऋतुराज गायकवाड उद्याच्या सामन्यात खेळण्याची शक्यता त्याच्या बरे होण्यावर अवलंबून असेल. तो अजूनही वेदनांमध्ये आहे आणि उद्या सकाळी नेटमध्ये कशी फलंदाजी करतो यावर आधारित आम्ही निर्णय घेऊ. जर तो खेळला नाही तर कोण नेतृत्व करेल हे आम्हाला माहित नाही. परंतु त्याच्या जागी एक तरुण यष्टीरक्षक येण्याची शक्यता आहे."

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एमएस धोनी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने त्यांचे सर्व 5 विजेतेपद जिंकले आहेत. 2024 च्या हंगामापूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले आणि तेव्हापासून ऋतुराज नेतृत्व करत आहे. पण, आता माही पुन्हा एकदा कर्णधार म्हणून परतू शकतो.

हे ही वाचा -

Rohit Sharma IPL 2025 : काळजावर दगड ठेवून हार्दिक पांड्याने घेतला मोठा निर्णय! रोहित शर्मा बाहेर, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नक्की चाललयं तरी काय?