MS Dhoni Marathi News: एमएस धोनीच्या फलंदाजीचा आनंद चाहत्यांनी बऱ्याच काळानंतर लुटला. धोनी जवळपास 308 दिवसांनी फलंदाजीसाठी मैदानात आला. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात धोनीने शेवटची फलंदाजी केली होती. मात्र या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.
काल (31 मार्च) चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात धोनीने स्फोटक फलंदाजी केली. धोनीच्या या खेळीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. धोनीच्या या आक्रमक खेळीची माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील कौतुक केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रिलिया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू ब्रेट ली आणि शेन वॉटसन यांचा देखील समावेश आहे.
ब्रेट ली काय म्हणाला?
धोनीच्या या खेळीवर ब्रेट ली म्हणाला की, मला धोनीकडून अजून फलंदाजीची अपेक्षा आहे. धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवे. तो उत्कृष्ट आहे, त्याचे मन अजूनही चांगले आणि तीक्ष्ण आहे. सीएसके, कृपया एमएस धोनीला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवा, असं ब्रेट लीने सांगितले.
शेन वॉटसन काय म्हणाला?
आयपीएलमध्ये शेन वॉटसन चेन्नई संघाकडून खेळला आहे. धोनीने शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार पाहून शेन वॉटसन खूप प्रभावित झाला. त्याचवेळी वॉटसनने ही धोनीची आजपर्यंतची सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले आहे. धोनी या फॉर्ममध्ये असताना तुम्हाला त्याच्याकडून हेच हवे आहे. खेळ जिंकण्याची क्षमता त्याच्या कारकिर्दीत अनेकवेळा आपण पाहिली आहे, असं शेन वॉटसन म्हणाला.
37 धावांची नाबाद खेळी-
धोनीने फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची नाबाद खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
चेन्नईचा पराभव-
आयपीएल 2024 च्या 13व्या क्रमांकाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 191/5 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने संघाकडून सर्वात मोठी 52 धावांची खेळी खेळली. याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने 51 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 6 बाद 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. रहाणेने संघासाठी 45 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय आठव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने चाहत्यांची मनं जिंकली.
संबंधित बातम्या:
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos