CSK Probable Playing 11, IPL 2024 : आयपीएल 17 व्या हंगामाचा रनसंग्राम आठवडाभरात सुरु होणार आहे. एमएस धोनीचा चेन्नई आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये चेन्नई यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. सलामीच्या सामन्याआधीच चेन्नईला दोन मोठे धक्के बसले आहेत. सलामी फलंदाज डेवोन कॉनवे सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. तर पथिरानाही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात चेन्नईची प्लेईंग कशी असेल, याबाबत आताच तर्क वितर्क लावला जात आहे. एमएस धोनी चेन्नईची प्लेईंग 11 निवडताना काय करतो ? हा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


आयपीएल 2024 आधी झालेल्या लिलावात चेन्नईच्या ताफ्यात अनेक खेळाडूंना घेतलेय. यामध्ये न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय शार्दूल ठाकूर याच्यावरही डाव खेळला आहे. अनकॅप खेळाडूंमध्ये समीर रिझवी याला संघात घेतले आहे. चेन्नईचा संघ कागदावर तगडा वाटतोय. पण दुखापतीमुळे चन्नईला प्लेईंग 11 निवडताना अडचणींचा समाना करावा लागू शकतो. 


डेवोन कॉनवे आणि मथीशा पथिराना दुखापतग्रस्त - 


स्टार सलामी फलंदाज डेवोन कॉनवे दुखापतीमुळे मे पर्यंत आयपीएल 2024 ला मुकणार आहे. तर युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाही अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो सुरुवातीच्या काही सामन्यंना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीपुढे प्लेईंग 11 निवडताना पेच निर्माण झाला असेल.


रचिन रवींद्र करणार आयपीएलमध्ये पदार्पण - 


डेवोन कॉनवेच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र याला चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी आहे. रचिन रवींद्र टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासोबत गोलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. भारतात 2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात रचिन रवींद्र यानं शानदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीने अनेकजण प्रभावीत झाले होते. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये पदर्पणाची संधी मिळू शकते. दुसरीकडे न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज डॅरेल मिचेल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता धुसूरच आहे.


चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीविरोधातील संभाव्य प्लेईंग 11 - 


ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिजवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महीश तीक्षणा आणि मुस्ताफिजुर रहमान. 


चेन्नईच्या ताफ्यात कोण कोण ?


एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, समीर रिजवी, शिवम दुबे, मोईन अली, शार्दूल ठाकूर, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, महीश तिक्ष्णा, मथीशा पथिराणा, शेख रशीद, डेवोन कॉन्वे, अवनीश राव अरावेली, मिचेल सँटनर, निशांत सिंधु, अजय मंडल, डेरिल मिचेल, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंह आणि तुषार देशपांडे