Mohammed Siraj dismisses Rohit Sharma GT VS MI IPL : आयपीएल 2025 चा हंगाम अशा अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे, ज्यांना भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे आहेत. अलिकडच्या काळात संघाबाहेर असलेले अनेक भारतीय खेळाडू आहेत. काही काळापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये निवड न झालेल्यांपैकी मोहम्मद सिराज देखील एक आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामन्यात मोहम्मद सिराज धुमाकूळ घालत आहे. त्याने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले, ज्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होते आहे.
रोहित शर्माची खराब फॉर्मशी झुंज.... मुंबई इंडियन्सचा स्टार आणि माजी कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये खराब फॉर्मशी झुंजत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तो शून्य धावांवर आऊट झाला होता, तर आता गुजरातविरुद्ध खेळताना रोहितने 4 चेंडूत 8 धावा काढून आपली विकेट दिली. मोहम्मद सिराजच्या सलग दोन चेंडूंवर रोहित शर्माने दोन चौकार मारले पण तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले. रोहित शर्मा 8 धावांवर बाद होताच सोशल मीडियावर त्याचे ट्रोलर्स त्याच्याबद्दल ट्विट आणि मीम्स बनवू लागले. रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सिराजने हातवारे करत भन्नाट सेलिब्रेशन केले.
एकीकडे रोहित शर्मा लवकर आऊट, दुसरीकडे मोठी कामगिरी!
एकीकडे रोहित शर्मा लवकर आऊट झाला, पण दुसरीकडे त्याने मोठी कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी रोहितने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 599 चौकार मारले होते. गुजरातविरुद्ध चौकार मारून तो आयपीएलच्या इतिहासात 600 किंवा त्याहून अधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनला. रोहित आयपीएलमध्ये 600 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने 222 सामन्यांमध्ये 768 चौकार मारले आहेत. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 711 चौकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर 663 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता रोहित शर्मा 601 चौकारांसह चौथा खेळाडू बनला आहे.
हे ही वाचा -