MI vs RR, IPL 2023 : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे मैदानावर मुंबई प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबई आण राजस्थान दोन्ही संघाला प्रथम फलंदाजी करायची होती. पण नाणेफेकीचा कौल राजस्थानने जिंकला. राजस्थानने मुंबईला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्माचा आज 36 वा वाढदिवस आहे. मुंबईचा संघ रोहित शर्माला विजयाचे गिफ्ट देणार का? याची चर्चा सुरु आहे.
मुंबई आणि राजस्थान संघात काही बदल करण्यात आले आहे. मुंबईने अर्जुन तेंडुलकरला बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्याशिवाय राजस्थानच्या संघात बोल्टचे पुनरागमन झालेय. मुंबईने आज जोफ्रा आर्चरला प्लेईंग ११ मध्ये खेळवले आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग ११
राजस्थान रॉयल्सचे 11 शिलेदार कोणते?
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, ध्रवु जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
मुंबईचे 11 खेळाडू कोणते ?
ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, पीयुष चावला, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, रायली मेरिडेथ, अर्शद खान
MI vs RR Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई (Mumbai Indians) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान (Rajasthan Royals) संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 आहे.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध राजस्थान सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.