MI vs LSG IPL 2025: बूम-बूम बुमराहचा कहर, मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी केला पराभव
MI vs LSG IPL 2025: आयपीएल 2025 चा 45 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे.

Background
MI vs LSG IPL 2025: आयपीएल 2025 चा 45 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायट्ससाठी आजचा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. या हंगामात मुंबई आणि लखनौ दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. यापूर्वी, जेव्हा दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते, तेव्हा ऋषभ पंतच्या लखनौ संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स आज पराभवाचा बदला घेणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या, मुंबईने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. लखनौनेही 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत, ते सहाव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी केला पराभव
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील शानदार गोलंदाजीच्या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु सूर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन यांच्या अर्धशतकांच्या मदतीने मुंबईने 20 षटकांत सात गडी गमावून 215 धावा केल्या. त्यानंतर लखनौ संघ 20 षटकांत 161 धावांवर सर्वबाद झाला. मुंबईकडून बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत 22 धावा देत चार विकेट्स घेतल्या. यासह, बुमराह मुंबईचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे आणि त्याने या बाबतीत लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे.
विल जॅक्सने लखनौच्या अडचणी वाढवल्या, पूरणनंतर पंतही OUT
निकोलस पूरननंतर कर्णधार ऋषभ पंतही आऊट झाला आहे. त्याला विल जॅक्सने आऊट केले. पंतने दोन चेंडूत चार धावा काढल्या. 7 षटकांनंतर लखनौ सुपर जायंट्सची धावसंख्या 67/3 आहे.
लखनौला सामना जिंकण्यासाठी 78 चेंडूत 149 धावांची आवश्यकता आहे.



















