Matheesha Pathirana IPL 2026 Auction : मागील आयपीएल हंगामात ज्या गोलंदाजीला फलंदाजांनी अक्षरशः धू धू धुतले, गेल्या हंगामात सर्वाधिक वाईड टाकण्याचा लज्जास्पद विक्रम करणाऱ्या खेळाडूने आता आयपीएलमध्ये भरपूर पैसे कमावले आहेत.  आम्ही श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाबद्दल बोलत आहोत, ज्याला आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 18 कोटी रुपयांत आपल्या संघात सामील करून घेतले.

आयपीएल 2025 पथिरानासाठी विसरण्यासारखा हंगाम (IPL 2026 Auction Marathi News)

आयपीएल 2025 हा पथिरानासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखाच ठरला. या हंगामात तो सर्वाधिक वाईड चेंडू टाकणारा गोलंदाज होता. मथीशा पथिरानाने एकूण 32 वाईड बॉल्स टाकल्या. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने 12 सामन्यांत 13 विकेट घेतल्या खऱ्या, पण त्यांचा इकॉनॉमी रेट तब्बल 10.13 इतकी होती. या कमकुवत कामगिरीनंतर सीएसकेने त्याला रिलीज केले आणि विशेष म्हणजे ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याच्यावर एकही बोली लावली नाही.

मथीशा पथिरानाचा आयपीएल प्रवास (Matheesha Pathirana IPL 2026 Auction)

मथीशा पथिरानाने 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो आजवर चारही हंगाम चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. आतापर्यंत आयपीएलमधील त्यांच्या आकडेवारीकडे पाहिले तर 32 सामने खेळला, ज्यामध्ये 47 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 8.6 होता. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की खराब हंगामानंतरही मथीशा पथिरानामध्ये सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे.

केकेआरचा मोठा मास्टरस्ट्रोक 

मथीशा पथिरानाला संघात घेत कोलकाता नाइट रायडर्सने आपला बॉलिंग अटॅक अधिक धारदार केला आहे. डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीसाठी पथिराना ओळखला जातो. आंद्रे रसेलच्या निवृत्तीनंतर डेथ ओव्हर्समध्ये केकेआरला जो पर्याय हवा होता, ती पोकळी पथिराना भरून काढू शकतो, असा संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे.

धोनी – मथीशा पथिरानाचा खरा गुरु

पथिरानाच्या कारकि‍र्दीत एम.एस. धोनीचा मोठा वाटा आहे. धोनीनेच सर्वात आधी या खेळाडूवर विश्वास दाखवला आणि त्याला डेथ ओव्हर्समध्ये संधी दिली. आयपीएल 2023 मध्ये पथिरानाने 19 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली आणि त्याच जोरावर त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळाली.

केकेआरचा बॉलिंग अटॅक आणखी मजबूत

पथिरानाच्या आगमनामुळे केकेआरचा गोलंदाजी विभाग अधिक तगडा केला आहे. संघात आधीच वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा आणि हर्षित राणा सारखे दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यात पथिरानाची भर पडल्याने केकेआरचा बॉलिंग अटॅक प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

हे ही वाचा -

IPL Auction 2026 : ऑक्शनचा धमाका! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर चेन्नईकडून 28 कोटींची उधळण, प्रशांत वीर अन् कार्तिक शर्मा ठरले रेकॉर्डब्रेकर्स