KKR vs LSG Live Score IPL 2025 : रोमांचक सामन्यात लखनौने मारली बाजी! केकेआरला चार धावांनी हरवले, रहाणेचे अर्धशतक अन् रिंकूचे प्रयत्न व्यर्थ
KKR vs LSG Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ ईडन गार्डन्सवर आमनेसामने आले आहेत.

Background
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live : कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ ईडन गार्डन्सवर आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. केकेआरचा हा त्यांच्या घरच्या मैदानावर तिसरा सामना आहे. यापूर्वी, ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये केकेआरने एक जिंकला होता आणि एक गमावला होता. याआधी खेळलेल्या 4 पैकी 2-2 सामन्यांमध्ये लखनौ आणि कोलकाता या दोघांनीही विजय मिळवला आहे. तर त्यांनी सामना 2-2 असा गमावला आहे.
रोमांचक सामन्यात लखनौने मारली बाजी! केकेआरला चार धावांनी हरवले
कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या शानदार फलंदाजीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत तीन गडी गमावून 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरला निर्धारित षटकांत सात गडी गमावून केवळ 234 धावा करता आल्या.
केकेआरला चौथा धक्का
रवी बिश्नोईने रमणदीप सिंगला बाद करून केकेआरला चौथा धक्का दिला आहे. दोन चेंडूत एक धाव घेत रमणदीप बाद झाला. केकेआरने 14 षटकांच्या अखेरीस चार विकेट गमावून 166 धावा केल्या आहेत. त्याला जिंकण्यासाठी 36 चेंडूत 73 धावा करायच्या आहेत.


















