Kolkata Knight Riders And Sunrisers Hyderabad IPL 2024 Final : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारणं, ही हैदराबादची यंदाच्या हंगामातील ताकद राहिली आहे. तर धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स अधिक धोकादायक होते. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे.


कोलकात्याचा 100 टक्के रेकॉर्ड - 


आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली. कोलकाता नाईट रायडर्स धावांचा पाठलाग करताना अधिक धोकादायक होते. 2024 हंगामात धावांचा पाठलाग करताना कोलकात्याचा पराभव झालाच नाही. आजही मोक्याच्या सामन्यात कोलकात्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. हैदराबादच्या फलंदाजांना लवकर बाद करत कमी धावसंख्यावर रोखण्यासाठी कोलकाता प्रयत्नशील असेल. 


कोलकात्यासाठी जमेची बाजू - 


आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत दोन वेळा चषकावर नाव कोरले. या दोन्हीवेळा कोलकात्याने धावांचा पाठलाग केला होता. 2012 आणि 2014 च्या हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने चषकावर नाव कोरले होते. या दोन्हीवेळा कोलकात्याने धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आयपीएल 202 मध्ये कोलकाता प्रथम गोलंदाजी करत आहे. कोलकात्याला धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. धावांचा पाठलाग करत कोलकाता तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरणार का? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. 


हैदराबाद जिंकणार का ?


हैदराबादने 2016 मध्ये चषकावर नाव कोरले होते. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादने आरसीबीचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते. या सामन्यात हैदराबादने धावांचा यशस्वी बचाव केला होता. आज चेपॉकवर हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. कोलकात्याला रोखून हैदराबादचा संघ पुन्हा एकदा चषकावर नाव कोरणार का ?  


आयपीएल 2024 मध्ये हैदराबादविरोधात कोलकात्याचा शानदार रेकॉर्ड - 


आयपीएल 2024 मध्ये कोलकात्याने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाताने स्पर्धेत वर्चस्व गाजवले. साखळी फेरीत कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये दोन वेळा आमनासामना झाला. त्या दोन्ही वेळा कोलकात्याने बाजी मारली. त्याशइवाय क्वालिफायर 1 सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेटने दारुण पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.  पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबादने आयपीएल 2024 हंगामात जबरदस्त कामगिरी केली. खासकरुन हैदराबादची फलंदाजी दमदार राहिली. हेड, अभिषेक अन् क्लासेन यानं प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फोडली आहे. आरसीबी आणि राजस्थानचा पराभव करत हैदराबादने फायनलमध्ये धडक मारली. 



कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग 11 


रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.


इम्पॅक्ट प्लेअर - अनुकुल रॉय, मनिष पांडे, नितीश राणा, केएस भरत शरफन रुदरफोर्ड


सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग 11 


ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी,शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि जयदेव उनादकट


इम्पॅक्ट प्लेअर - अब्दुल समद, मयांक मार्केंडय, ग्लेन फिलिप्स, वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक